PCMC Commissioner : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे ट्विटर हँडल सुरू

नेटिझन्स आणि शहरातील नागरिकांशी ट्विटरद्वारे थेट संवाद साधण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी @CP_PCCity हे ट्विटर हँडल सुरू केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 28 Apr 2023
  • 01:22 am
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे ट्विटर हँडल सुरू

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे ट्विटर हँडल सुरू

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

नेटिझन्स आणि शहरातील नागरिकांशी ट्विटरद्वारे थेट संवाद साधण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी @CP_PCCity हे ट्विटर हँडल सुरू केले आहे.

शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होऊन पाच वर्ष उलटल्यावर आता पोलीस आयुक्तांचे ट्विटर हँडल सुरू करण्यात आले आहे. याद्वारे पोलीस आयुक्त चौबे यांच्याशी नागरिकांना थेट संवाद साधता येणार आहे. तसेच काही प्रश्न असतील तर ते विचारता येणार आहेत. पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ ला कार्यान्वित झाल्यावर पुढील वर्षभरात ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम हे सोशल मीडिया अकाऊंट सुरू करण्यात आले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांचे सोशल मीडियावरील अकाऊंट बऱ्यापैकी ॲक्टिव्ह होते. मात्र, कोरोना कालावधीनंतर ही अकाऊंट सक्रिय राहिली नाहीत.

पोलिसांनी केलेले उत्कृष्ठ तपास, आवाहन आदींबाबत पोस्ट केल्या जात आहेत. पोलिसांच्या पोस्टवर नागरिक प्रतिसाद देतात, प्रश्न, समस्या उपस्थित करतात. त्यांच्या समस्या नोंदवून घेत पोलीस संबंधितांकडे त्या पाठवत आहेत.

नागरिकांना कोणत्याही स्वरूपाची माहिती हवी असल्यास अथवा एखादी तक्रार आयुक्तांऐवजी अन्य अधिकाऱ्यांना करायची झाल्यास नागरिकांनी @PCcityPolice या ट्विटर हँडलचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story