वाहतूक सुरक्षा गरजेचीच
ओश्विन कढव
आपल्या परिसरात पाण्याच्या प्रश्नासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या स्वाती मोहोळ. सामाजिक प्रश्नांवर नेहमीच अग्रेसर असणाऱ्या स्वाती मोहोळ या 'जरा देख के चलो' या अभियानात सहभागी होत रस्त्याचे राजे बनल्या. वाहतुकीला शिस्त लावली. त्या भाजपच्या सदस्यही आहेत. त्यामुळे त्या एकट्याच या मोहिमेत सहभागी झाल्या नाहीत, त्यांच्यासोबत त्यांच्या ग्रुपमधील १३ स्वयंसेवकांनी या अभियानात सहभाग घेतला. या सगळ्यांनी अत्यंत वर्दळीच्या विद्यापीठ चौकात वाहतूक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून वाहतूक नियंत्रित केली.
मोहोळ या शरद मोहोळ यांच्या धर्मपत्नी. सामाजिक मुद्यांसोबतच महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी अनेक वर्षांपासून झगडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून स्वाती मोहोळ ओळखल्या जातात.
मोहोळ म्हणाल्या की, याच सामाजिक भावनेमधून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी 'सीविक मिरर', 'पुणे टाइम्स मिरर', आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या 'जरा देख के चलो' अभियानात सहभाग घेतला. वाहतूक कोंडी ही पुणे शहरातील सर्वात मोठी समस्या आहे. मला याचा विशेष आनंद वाटतो की, मी हा प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेल्या विधायक उपक्रमाला थोडासा का होईना पण हातभार लावला, असेही त्यांनी नमूद केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.