‘जरा देख के चलो ’ उपक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोगत. वाहतूक नियंत्रण केल्यावर ते म्हणतात, पोलीस आमचे मित्र झाले.
ओश्विन कढव
feedback@civicmirror.in
‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’ ने पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने हाती घेतलेल्या ‘जरा देख के चलो’ या उपक्रमाची माहिती जेव्हा त्याला कळाली तेव्हा १९ वर्षांच्या अयान शेखने सेकंदाचाही वेळ दवडला नाही आणि रस्त्याचे राजे बनण्यासाठी आपले नाव नोंदवले. अयान सिंहगड ॲकाडमी ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतो. अयानच्या पावलावर पाऊल टाकून त्याचे मित्र यश फोंडगे, ओम रुणवाल आणि मनीष जाधव हे देखील ‘जरा देख के चलो’ उपक्रमात सहभागी झाले. आता हे सारेजण विद्यापीठासमोरील आनंद ऋषी चौकात वाहतुकीचे नियंत्रण करतात. या अनुभवाबाबत ते म्हणतात की, पोलिसांसमवेत काम केल्याने वाहतूक समस्येबाबतचा आमचा दृष्टीकेन बदलण्यास मदत झाली. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी ते किती अविश्रांत कष्ट घेतात, याचीही आपणाला कल्पना आली. पुणे अधिक सुरक्षित करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न कौतुकास्पद असून, आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो.
वाहतूक पोलिस आपले नवे मित्र झाल्याचे सांगून हे चारही मित्र म्हणतात की, त्यांनी आम्हाला संयम शिकवला. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.