Traffic police : वाहतूक पोलीस झाले शिक्षक!

पुणे टाइम्स मिरर, सीविक मिरर आणि पुणे शहर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या 'जरा देख के चलो' या उपक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. नागरिकांमध्ये वाहतुकीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आणि सुरक्षित प्रवास करण्यावर भर द्यावा यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाचे धडे मिळावेत, यासाठी वाहतूक पोलीस त्यांना शिक्षकाच्या भूमिकेत जाऊन शिकवत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 10 May 2023
  • 12:22 am
वाहतूक पोलीस झाले शिक्षक!

वाहतूक पोलीस झाले शिक्षक!

पुणे टाइम्स मिरर, सीविक मिरर आणि पुणे शहर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या 'जरा देख के चलो' या उपक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. नागरिकांमध्ये वाहतुकीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आणि सुरक्षित प्रवास करण्यावर भर द्यावा यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाचे धडे मिळावेत, यासाठी वाहतूक पोलीस त्यांना शिक्षकाच्या भूमिकेत जाऊन शिकवत आहेत. 

विद्यार्थ्यांना त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीबद्दल अधिक जागरूक राहण्यासाठी आणि रस्त्यावर चालताना किंवा सायकल चालवताना सजग राहण्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरते आहे. यामुळे पुण्यातील गजबजलेल्या रस्त्यांवरील अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. शहरातील विविध चौकांमध्ये विद्यार्थी वाहतूक पोलिसांसोबत काम करत आहेत. पोलीसदेखील विद्यार्थ्यांना वाहतुकीचे मूलभूत नियम शिकवत असून, नियमनाचे धडे देत आहेत.

वाहतूक सुरक्षेचे महत्त्व समजून घेणे आणि रस्त्यावरील स्वत:चे आणि इतरांचे रक्षण करण्यासाठी पावले उचलणे हे केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story