वाहतूक वीरांनी घडवली सुरळीत वाहतुकीची सुरावट!
महिन्यापेक्षा अधिक काळ ‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर‘ ने पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने सुरू केलेल्या ‘जरा देख के चलो’ या अनोख्या उपक्रमाने शहरभर योग्य आणि सकारात्मक वातावरण तयार केले. ‘जरा देख के चलो’ या उपक्रमाला मदतीचा हात देण्यासाठी स्वयंसेवक मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. शहरातील विविध चौकात वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी गेल्या आठवड्यात महेश जाधव, चिटणीस, हुजेफा टिंबवाला, बाळा ढमाले, सुरेश, भारत, प्रशांत, प्रतीक आणि प्रसाद कांबळे वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी पुढे आले. सिमला ऑफीस, बालगंधर्व चौक, अलका चौक, गुडलक चौकात स्वयंप्रेरणेने पुढे आलेल्या या स्वयंसेवकांनी जबाबदारी ओळखून वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत केली. वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून देणाऱ्या ‘हेल्प रायडर्स’ च्या स्वयंसेवकांनीही वाहतुकीला शिस्त लावण्याची आपली जबाबदारी उचलली आणि ते ‘जरा देख के चलो’ मध्ये सहभागी झाले. एकूणच स्वयंसेवकांच्या मदतीने सुरळीत वाहतुकीची सुरावट जमली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.