अंत्यसंस्कार मोबाईल टॉर्चने करण्याची वेळ
सीविक मिरर ब्यूरो
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या कोळेवाडीतील ग्रामस्थांच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामपंचायतीकडून बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीत वीज नसल्याने मोबाईल टॉर्च आणि बॅटरीच्या साहाय्याने गावातील व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर ओढवली आहे.
कोळेवाडी हद्दीतील नवीन सर्व्हे क्रमांक ५ मध्ये, जांभूळवाडी-कोळेवाडी ग्रुप ग्रामपंचायत असताना स्मशानभूमी बांधण्यात आली. त्यानंतर सदरील स्मशानभूमीत वीज आणि पाण्याची कोणतीही सोय ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली नाही. शिवाय स्मशानभूमीला रंगही देण्यात आला नव्हता. स्मशानभूमीकडे जाणारा पक्का रस्ता नाही.
आदिवासीपाडा कोळेवाडी युवक समिती, कोळेवाडी यांच्या मते, ‘‘महापालिकेकडून आमची घोर निराशा होत आहे. पाणी, कचरा, ड्रेनेज या सुविधाही महापालिका आम्हाला पुरवू शकत नाही. स्मशानभूमीत अद्याप वीज आलेली नसल्याने अंत्यसंस्कारदेखील आम्हाला मोबाईल टॉर्च आणि बॅटरीच्या उजेडात करावे लागत आहेत. महापालिकेने आमची इतकी
प्रतारणा करू नये.’’
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.