टेंडरची माहिती मागवण्याची धमकी आिण इम्पॅक्ट

सांगवी परिसरातील मुळा नदीपात्रात जलपर्णीमुळे डास कीटकांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होवून नागरिकांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. याबाबत नागरिकांमधून जलपर्णी हटवण्याची मागणी होत होती. लोकांनी टेंडरची माहिती

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 22 Mar 2023
  • 11:24 am
टेंडरची माहिती मागवण्याची धमकी आिण इम्पॅक्ट

टेंडरची माहिती मागवण्याची धमकी आिण इम्पॅक्ट

नागरिकांच्या दणक्याने मुळा पात्र झाले जलपर्णीविरहित

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

सांगवी परिसरातील मुळा नदीपात्रात जलपर्णीमुळे डास कीटकांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होवून नागरिकांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. याबाबत नागरिकांमधून जलपर्णी हटवण्याची मागणी होत होती. लोकांनी टेंडरची माहिती 

मागवण्याची घोषणा करताच सूत्रे हलली आणि मंगळवारी नदीपात्रातील जलपर्णी तातडीने हलवण्यात आली.

नदीपात्रातील पाणी प्रवाही नसल्याने ठिक-ठिकाणी पाण्यावर हिरव्या रंगाचा तवंग आला होता. याशिवाय परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिक त्रासून गेले होते. मुळा नदीकाठावरील मधुबन येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात डासांच्या त्रासामुळे जाणेही शक्य होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले होते. मुळा नदीतील जलपर्णीमुळे मुळा नदी किनारा परिसरातील मधुबन सोसायटी परिसर, शितोळेनगर, मुळानगर, ढोरेनगर, पवारनगर, पवनानगर, संगमनगर आदी भागातील नदीकाठच्या निवासी भागांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. एकीकडे प्रशासनाने जलपर्णी काढण्याचे टेंडर दिले असल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात काम कुठे आणि किती झाले आहे? काम सुरू आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत होते. जलपर्णी काढण्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी नागरिकांमधून मागणी होत होती.  

प्रशासन फक्त वेळकाढूपणा करत होते. मधुबन परिसरात जलपर्णीमुळे डासांचा त्रास वाढला होता. त्यामुळे आम्हाला असा पुढाकार घ्यावा लागला असल्याची माहिती स्थानिक रहिवासी गणेश ढोरे यांनी दिली. मधुबन येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात येणाऱ्या नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकर पात्र स्वच्छ करा नाहीतर आंदोलन करावे लागेल, असा इशारा आम्ही दिला होता. काम झाल्याने किमान त्रासातून सुटका होईल, अशी अपेक्षा असल्याची भावना मधुबन परिसरात वास्तव्यास असलेल्या राजू सावळे यांनी व्यक्त केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story