...तर न्यायालयात दाद मागू
# पुणे
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत आयाेगाने पुनर्विचार केला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागू. सरकार या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. २१) दिली.
नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करा, या मागणीसाठी एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अनेक दिवसांपासून पुण्यात आंदाेलन करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या मताशी सरकार सहमत असल्याचे नमूद करून फडणवीस म्हणाले, ‘‘एमपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निराशा असून त्यांना अभ्यासासाठी आयाेगाने थोडा वेळ द्यावा. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आयाेगास पुन्हा पत्र पाठवले आहे. आम्ही एमपीएससी विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून यात काेणीही राजकारण आणू नये.’
‘‘नवीन अभ्यासक्रम आताच लागू करण्यापेक्षा २०२५ पासून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. त्यावर माझे मत असे की, एमपीएससी स्वायत्त संस्था असून राज्य सरकार त्यांना आदेश देऊ शकत नाही. सरकारचा प्रस्ताव सर्व सदस्यांसमोर समाेर ठेवला असल्याचे एमपीएससीने कळवले आहे,’’ असे फडणवीस यांनी सांगितले.
खासदार संजय राऊत यांच्या आरोपांबद्दल फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘राजकारणात कधी माणूस वर जातो तर कधी खाली जातो. परंतु इतके निराश होऊन मनात येईल ते बाेलायचे यातून त्यांच्या बुद्धीची कीव लाेक करतात. त्यांच्या बाेलण्याने काही फरक पडणार नाही.’’ मोठे नेते बोलले की, खरे असे त्यांना वाटते. परंतु राऊत यांच्यासारख्या निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ, अशा शब्दात फडणवीस यांनी त्यांना फटकारले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.