त्यांचा खेळ, आमचा खोळंबा
कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शुक्रवारी (दि. २४) शेवटचा दिवस होता. त्यामुळे दोन्ही प्रमुख उमेदवारांनी आपली ताकद दाखवण्यासाठी मोठ्या रॅलीचे आयोजन केले होते. भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही रॅलीत सहभागी झाले होते. दुसरीकडे काँग्रेसनेसुद्धा रॅली काढली होती. दोन्ही रॅली एकाच वेळी एकाच भागात असल्यामुळे कसबा परिसरातील नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.