ट्रॅफिक पोलिसांनीच बुजवले खड्डे

एमआयडीसी भागातून शहरात येणाऱ्या वाहतुकीला खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होत असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या तळवडे वाहतूक विभागाने हे खड्डे स्वतः बुजवून घेतले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने नाईलाजाने पोलिसांना हे काम करावे लागत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 15 Mar 2023
  • 10:53 am
ट्रॅफिक पोलिसांनीच बुजवले खड्डे

ट्रॅफिक पोलिसांनीच बुजवले खड्डे

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

ट्रॅफिक पोलिसांनीच

बुजवले खड्डे

एमआयडीसी भागातून शहरात येणाऱ्या वाहतुकीला खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होत असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या तळवडे वाहतूक विभागाने हे खड्डे स्वतः बुजवून घेतले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने नाईलाजाने पोलिसांना हे काम करावे लागत आहे.

चाकण भागातून शहरात येणारी वाहतूक पूर्वी तळवडे आयटी पार्क परिसरातून येत होती. मात्र, तेथील रस्ता कमी पडत असल्याने अनेक वाहने मागील काही महिन्यांपासून मोई चाकण रस्त्याने स्पाईन रोड मार्गे मोशी आणि शहरात दाखल होत आहेत. परंतु, आळंदी बीआरटी मार्गालगत तसेच डायमंड चौक,

त्रिवेणीनगर चौक येथील खड्ड्यांमुळे वाहनांच्या रोज रांगा लागत होत्या. सातत्याने ही समस्या समोर येत असल्याने पोलिसांकडून महापालिकेच्या या भागातील संबंधित विभागाच्या अभियंत्यांकडे हे खड्डे बुजवण्यासाठी पाठपुरावा केला जात होता. परंतु, महापालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने कोंडीत भर पडत होती. 

या सगळ्यांवर तोडगा काढण्यासाठी मागील आठ दिवसांपासून तळवडे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन या भागातील खड्डे बुजवून घेतले आहेत.

करोनानंतर अनेक कंपन्या पूर्वपदावर आल्या आहेत. कंपनी आणि आयटी पार्कमध्ये काम करणारे कामगार दररोज प्रत्यक्ष कामावर येत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा वाढू लागला आहे. देहूगावात त्रिवेणीनगरमार्गे जाताना भालेकर चौक तसेच तळवडे येथील चौकातून प्रवास करावा लागतो. त्याच बरोबर काही अवजड वाहने चाकण एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे येथील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.

पूर्वी ग्रामीण पोलीस दलाच्या अखत्यारीत असलेल्या या परिसरासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी स्वतंत्र तळवडे वाहतूक विभागाची निर्मिती केली आहे. दोन अधिकारी आणि २० कर्मचारी या विभागासाठी नेमण्यात आले आहेत. मात्र, येथील वाहनांची संख्या, रस्त्याची दुरवस्था आणि महापालिकेची उदासीनता पाहता अतिरिक्त पोलीस मनुष्यबळाची गरज आहे. हा परिसर महापालिका आणि देहूगाव नगरपरिषद, चाकण एमआयडीसी या तिघांच्या सीमेवर आहे. त्यामुळे या परिसरातील रस्त्याशी संबंधित अडचणी दूर करताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. येथील रस्ता दुभाजक स्थानिकांनी आपल्या सोयीनुसार तोडून ठेवले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने पोलिसांनी हे दुभाजक पूर्ववत केले आहेत. पण रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी तरी महापालिकेने आवश्यक कामे वेळेत करावीत, अशी अपेक्षा पोलीस कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story