बेशुद्ध व्यक्तीला केली पोलिसाने मदत

पुणे सेंट्रल बिल्डिंग परिसरातील पीएमपी बस स्टॉपला एक व्यक्ती उभी होती. उभी असतानाच ती व्यक्ती चक्कर येऊन कोसळली, तेव्हा त्याच्या दिशेने अनेकजण धावले. त्या गर्दीत राज्य राखीव पोलीस दलातील एक शिपाईही होता. आलेल्या गर्दीतून कोणीही त्या पडलेल्या व्यक्तीच्या जवळ जात नव्हते, तेव्हा तो पोलीस जवळ गेला. चक्कर येऊन पडलेल्या माणसाच्या तोंडाला फेस आला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 25 Mar 2023
  • 02:41 pm
बेशुद्ध व्यक्तीला केली पोलिसाने मदत

बेशुद्ध व्यक्तीला केली पोलिसाने मदत

सेंट्रल बिल्डिंग परिसरात जपली माणुसकी; प्रथमोपचार करून रुग्णालयात केले दाखल

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.

पुणे सेंट्रल बिल्डिंग परिसरातील पीएमपी बस स्टॉपला एक व्यक्ती उभी होती. उभी असतानाच ती व्यक्ती चक्कर येऊन कोसळली, तेव्हा त्याच्या दिशेने अनेकजण धावले. त्या गर्दीत राज्य राखीव पोलीस दलातील एक शिपाईही होता. आलेल्या गर्दीतून कोणीही त्या पडलेल्या व्यक्तीच्या जवळ जात नव्हते, तेव्हा तो पोलीस जवळ गेला. चक्कर येऊन पडलेल्या माणसाच्या तोंडाला फेस आला होता. या पोलिसाने प्रयत्न करत त्या माणसाला शुद्धीवर आणले आणि त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.

एसआरपीएफ गट २ चे  पोलीस शिपाई बक्कल नं. ६७० युगराज खानू पुजारी आपल्या ड्यूटीवरून घरी निघाले होते. ते  सेंट्रल बिल्डिंग पुणे स्टेशन येथील बस स्टॉपवर थांबले होते. तिथेच काही अंतरावर साज मुळूक शेख उभे होते. यावेळी त्यांना एकाएकी चक्कर आली. ते खाली पडल्याचे पाहून गर्दीतील लोक त्यांच्या दिशेने धावले. पण त्यांची 

अवस्था पाहून कोणीही त्यांच्या जवळ जात नव्हते. तेव्हा पोलीस शिपाई युगराज पुजारी तिथे धावून गेले. तेव्हा शेख यांच्या तोंडाला फेस आला होता. त्यांची दातखीळ बसली होती. डोक्यालाही मार बसला होता. 

पुजारी यांनी तत्काळ रुग्णवाहिकेला फोन केला. शेख यांची छाती पंपिंग केली. तोंडात बोटे घालून दातखीळ उघडण्याचा प्रयत्न केला. या प्रथमोपचारामुळे शेख यांना शुद्ध आली होती, पण धोका टळला नव्हता. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने अजूनही त्यांना चक्कर येत होती. तेवढ्यात त्यांची पत्नी, भाऊ, मुलगा आले. त्यांच्या मदतीने रुग्णवाहिकेची वाट न पाहता रिक्षातून रुग्णालयात नेले. 

यावेळी शेख यांच्या कुटुंबाने पोलीस शिपाई युगराज पुजारी यांचे आभार मानले. राज्य राखीव दलाच्या पोलिसाने दाखवलेल्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. आजच्या व्यस्त जीवनात माणुसकीचे दर्शन घडवण्याची वेळ होती तेव्हा पोलीस मदतीला धावून आला. त्याने एका रुग्णास मदत करत त्याचा जीव वाचवला. पोलीस नावाच्या माणसाने दाखवलेल्या माणुसकीचा एक आदर्श या घटनेच्या निमित्ताने बघायला मिळाला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story