पुण्यातील ‘बाशिंगबाजी’चे लोण पोहोचले पिंपरी- चिंचवड शहरात

पुण्यातील फ्लेक्सबाजीचे लोण आता थेट पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग आणि पिंपरी- चिंचवड शहरात येऊन पोहोचले आहे. अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा, अशा आशयाचे फलक लागले आहे. जनतेने कोणत्या उमेदवाराला कौल दिला आहे, हे गुरुवारीच स्पष्ट होणार असताना आधीच अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे आमदार म्हणून फलक लागल्याने चर्चेला उधाण आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 2 Mar 2023
  • 05:33 pm
पुण्यातील ‘बाशिंगबाजी’चे लोण पोहोचले पिंपरी- चिंचवड शहरात

पुण्यातील ‘बाशिंगबाजी’चे लोण पोहोचले पिंपरी- चिंचवड शहरात

अश्विनी जगताप यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल फलक

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@vijayCmirror

पुण्यातील फ्लेक्सबाजीचे लोण आता थेट पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग आणि पिंपरी- चिंचवड शहरात येऊन पोहोचले आहे. अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा, अशा आशयाचे फलक लागले आहे. जनतेने कोणत्या उमेदवाराला कौल दिला आहे, हे गुरुवारीच स्पष्ट होणार असताना आधीच अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे आमदार म्हणून फलक लागल्याने चर्चेला उधाण आले आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाका आणि पिंपरी चौकात अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदारपदी निवड झाल्याचे फ्लेक्स लागले आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित, पवार आणि जयंत पाटील यांच्यासारखे दिगग्ज नेते चिंचवड पोटनिवडणुकीसाठी ठाण मांडून होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रचार सभा घेत रॅली काढली होती. चिंचवड मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले होते.

याआधी मंगळवारी, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाआधीच पुण्यातील वडगाव भागात धंगेकर यांच्या विजयाचे फ्लेक्स लावण्यात आले होते. याविरोधात पुणे महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने तक्रार दिल्यानंतर पोलिसात याप्रकरणी २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिंहगड रोड पोलिस ठाण्यात राहुल मानकर आणि अतुल नाईक यांच्या विरोधात शहर विद्रूपीकरण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे, पुण्यातील सारसबाग आणि वडगाव चौकात भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या विजयाचे फलक लागले  होते. निकालाआधीच ‘आमदार हेमंत रासने’ असा उल्लेख करत समर्थकांकडून फलक लावून रासने यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

दोन्ही फलक नंतर संभाव्य परिस्थिी लक्षात घेऊन काढून टाकण्यात आले होते. या उतावळ्या बाशिंगबाज कार्यकर्त्यांनी मात्र खूपच मनोरंजन केले. दरम्यान  चिंचवडसाठी थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे आज  (गुरुवारी) मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संगणकीय प्रणालीने सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या टेबलवरील कामकाज त्या कर्मचाऱ्यांना सोपवले जाणार आहे. सुरुवातीला टपाली मतमोजणी होईल. मतमोजणीच्या निर्धारित वेळेपर्यंत प्राप्त टपाली मतदानाची मोजणी करण्यात येईल. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरू होण्याच्या वेळेपर्यंत प्राप्त होणाऱ्या टपाली मतदानाचीच मोजणी करण्यात येणार आहे. टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे.

सर्वप्रथम टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर १ मतमोजणी पर्यवेक्षक, १ मतमोजणी 

सहायक आणि १ सूक्ष्म निरीक्षक असे अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story