नरडीचा घोट घेणाऱ्याचा मित्राने केला खून

सराईत गुन्हेगार दारू पीत असताना एकाने दुसऱ्या मित्राकडे रक्त पिण्याची इच्छा व्यक्त करत त्याच्या गळ्याचा कडाडून चावा घेतला. त्यामुळे चिडलेल्या मित्राने, तू माझं रक्त पिणार का म्हणत त्याचा दगडाने ठेचून खून केला. पिंपरी- चिंचवडमधील मोशी भागात ही घटना घडली असून, भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Sat, 5 Aug 2023
  • 12:25 pm
नरडीचा घोट घेणाऱ्याचा िमत्राने केला खून

नरडीचा घोट घेणाऱ्याचा मित्राने केला खून

सराईत गुन्हेगारांच्या पार्टीत रक्त पिण्यासाठी घेतला मित्राच्या गळ्याचा चावा, चिडून दगडाने ठेचून केला खून

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

सराईत गुन्हेगार दारू पीत असताना एकाने दुसऱ्या मित्राकडे रक्त पिण्याची इच्छा व्यक्त करत त्याच्या गळ्याचा कडाडून चावा घेतला. त्यामुळे चिडलेल्या मित्राने, तू माझं रक्त पिणार का म्हणत त्याचा दगडाने ठेचून खून केला. पिंपरी- चिंचवडमधील मोशी भागात ही घटना घडली असून, भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

राहुल अप्पासाहेब लोहार (वय २४, रा. जाधववाडी चिखली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. इस्ताक ईनामूल खान (रा. संजय गांधी झोपडपट्टी, मोशी) असे खून झालेल्याचे नाव आहे. लोहार आणि खान दोघेही सराईत गुन्हेगार असून, दोघांवर गंभीर स्वरूपाचे प्रत्येकी ४/५ गुन्हे दाखल आहेत. इस्ताक खान याला २०२० मध्ये तडीपार करण्यात आले होते. त्याची तडीपारीची कारवाई जानेवारी २०२३ मध्ये संपली होती.

सर्वसामान्यांसह पोलिसांना चक्रावून टाकणारी ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. लोहार आणि खान अन्य मित्रांसह मद्यपान करत होते.

तेव्हा अचानक खान याने लोहार याला तुझे रक्त पिण्याचे इच्छा व्यक्त केली. तसेच त्याच्या गळ्याचा कडाडून चावा घेत रक्त पिण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. तेव्हा अन्य दोन मित्रांनी या दोघांचे वाद मिटवले होते.

लोहार याने स्वतःची कशी-बशी सुटका करून तिथून पळ काढला होता. या घटनेच्या काही तासानंतर लोहार इस्ताक खानकडे गेला. "तू माझे रक्त पिणार का? मी तुला जिवंत सोडणार नाही" असं म्हणून दगडाने ठेचून इस्ताक खान याचा खून केला.

या घटनेची माहिती मिळताच भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी लोहार याचा शोध घेण्यास सुरुवात केली. निरीक्षक राजेंद्र निकाळजे, फौजदार सचिन चव्हाण, कर्मचारी शरद गांधीले, नितीन खेसे, अनिल जोशी आदींसह पथक लोहार याच्या मागावर होते. लोहार हा मोशी परिसरातील एका घरात लपून बसला असल्याची माहिती पोलीस कर्मचारी प्रवीण मुळूक यांना मिळाली. त्यानंतर पथकाने लोहार याला अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ तपास करीत आहेत.

अल्पवयीन मुलीवर डान्स टीचरचा लैंगिक अत्याचार

तू दिसायला सुंदर आहे. तुला चित्रपटामध्ये काम मिळवून देतो असे सांगून हडपसर भागात राहणार्‍या १५ वर्षीय मुलीवर डान्स टीचरने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.सुशील राजेंद्र कदम (वय ३२, रा. सर्व्हे नंबर १०३ गोपालपट्टी चौक मांजरी बुद्रुक ) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील सहा महिन्यापासून आरोपी सुशील कदम यांच्याकडे पीडित मुलगी डान्स शिकण्यास जात होती. तू दिसायला सुंदर असून तुला चित्रपटामध्ये काम मिळवून देतो असे आरोपीने मुलीस सांगितले.ही बाब पीडित मुलीने घरी सांगितली. त्यानंतर आरोपीने अनेक वेळा फस्ट लुकसाठी मुलीला घेऊन गेला.त्या प्रत्येक वेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत तू जर कोणाला काही सांगितलेस, तर तुझ्या आई वडीलांना जीवे ठार मारेन अशी धमकी दिली होती. त्यामुळे पीडित मुलीने हा प्रकार घरी सांगितला नाही. कालदेखील फस्ट लुकसाठी पीडित मुलीला आरोपी घेऊन गेला. पीडित मुलीच्या आईला संशय आल्याने आरोपीस फोन केला. तुम्ही कुठे आहात, आता भेटायच आहे असे सांगितल्यावर आरोपीने  उडवाउडवीची उत्तर दिली.आम्ही सासवड येथील लॉजवर असल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित मुलीचे घरचे सर्वजण घटनास्थळी गेले. त्यावेळी पीडित मुलीने तिच्यावर होणार्‍या अत्याचाराबाबत सांगितले. या घटनेनंतर आरोपी सुशील कदम विरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story