कोयता गँग प्रमुखाच्या मुसक्या आवळल्या

गुलटेकडीतील ओैद्योगिक वसाहतीत दहशत माजविणाऱ्या कोयता गँगचा म्होरक्या सचिन माने याला स्वारगेट पोलिसांच्या पथकाने पकडले. माने याच्यासह नऊ साथीदारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून काेयते, तलवार, पालघन असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 15 Mar 2023
  • 11:23 am
कोयता गँग प्रमुखाच्या मुसक्या आवळल्या

कोयता गँग प्रमुखाच्या मुसक्या आवळल्या

झटापटीत पोलीस कर्मचारी जखमी, कोयते, कुऱ्हाडी, तलवार, पालघन जप्त

#मार्केटयार्ड

गुलटेकडीतील ओैद्योगिक वसाहतीत दहशत माजविणाऱ्या कोयता गँगचा म्होरक्या सचिन माने याला स्वारगेट पोलिसांच्या पथकाने पकडले. माने याच्यासह नऊ साथीदारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून काेयते, तलवार, पालघन असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी सचिन परशुराम माने (वय २४), रोहित मधुकर जाधव (वय २७), अजय प्रमोद डिखळे (वय २४), यश किसन माने (वय १८), रोहित मधुकर जाधव (वय २७), अमर तानाजी जाधव (वय ३२), विजय प्रमोद डिखळे (वय १८), मोन्या ऊर्फ सूरज सतीश काकडे (वय २६, सर्व रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी), निखील राकेश पेटकर (वय २२, रा. आईमाता मंदिराजवळ, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी आणि त्यांचे साथीदार पल्या पासंगे (वय २१), आयुष किसन माने (वय २१, दोघे रा. गुलटेकडी), माया ऊर्फ अभिषेक पाटोळे (वय २२) प्रमोद ऊर्फ पम्या (दोघे रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याचे स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले.

गुलटेकडी ओैद्योगिक वसाहतीतील (मीनाताई ठाकरे वसाहत) वर्चस्वाच्या वादातून सचिन माने आणि साथीदारांनी प्रतिस्पर्धी टोळीतील प्रकाश पवार आणि साथीदारांवर कोयत्याने वार केले होते. माने आणि साथीदारांनी कोयते उगारून परिसरात दहशत माजविली होती. तोडफोड करून आरोपी माने साथीदारांसह पसार झाला होता. पसार झालेला माने घोरपडे पेठेत मैत्रिणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून मानेला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांवर कोयता उगारला. झटापटीत पोलीस कर्मचारी शिवा गायकवाड जखमी झाले.

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ गायकवाड, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, मुकुंद तारू, शिवा गायकवाड, अनिस शेख, दीपक खेंदाड, सुजय पवार, सोमनाथ कांबळे, फिरोज शेख, रमेश चव्हाण यांनी ही कारवाई केली. माने याने ओैद्योगिक वसाहतीत एसएम कंपनी नावाने गुन्हेगारी टोळी सुरू केली होती. त्याच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी असे गंभीर गुन्हे स्वारगेट, सहकारनगर, मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्याच्या विरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली होती. त्याला वर्षभरासाठी येरवडा पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story