रस्त्याचे राजे आले मदतीसाठी धावून

हातातील काठी आणि शिट्टीने वाहनचालकांचे लक्ष वेधून घेत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना वाहतूक नियमांचे धडे देण्याची जबाबदारी आता पुणेकरांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. वाहतुकीच्या समस्येबाबत केवळ नुसते बसून तक्रारीचा सूर काढण्याऐवजी शहरातील वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी नागरिकांनी पुणे शहर वाहतूक पोलिसांना मदतीचा हात दिला आहे. त्याबद्दल सीविक मिरर, पुणे टाइम्स मिरर आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांचे आभार.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 5 Apr 2023
  • 09:14 am
रस्त्याचे राजे आले मदतीसाठी धावून

रस्त्याचे राजे आले मदतीसाठी धावून

हातातील काठी आणि शिट्टीने वाहनचालकांचे लक्ष वेधून घेत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना वाहतूक नियमांचे धडे देण्याची जबाबदारी आता पुणेकरांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. वाहतुकीच्या समस्येबाबत केवळ नुसते बसून तक्रारीचा सूर काढण्याऐवजी शहरातील वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी नागरिकांनी पुणे शहर वाहतूक पोलिसांना मदतीचा हात दिला आहे. त्याबद्दल सीविक मिरर, पुणे टाइम्स मिरर आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांचे आभार.

त्यांनी सुरू केलेले 'जरा देख के चलो' अभियानात शहरातील ३० ठिकाणी स्वयंसेवक वाहतूक व्यवस्थापनासाठी समर्पित भावनेने काम करत आहेत.

 ही मोहीम नागरिकांना, वाहतूक पोलिसांसमोरील आव्हाने समजून घेण्यास आणि त्यांना अधिक जबाबदारीने काम करण्यात मदत करत आहे. इतर शहराप्रमाणे पुण्यातील वाहतुकीची अवस्था वाईट नाही. गर्दीच्या वेळी थोडी कोंडी होत असते अन्यथा इतर वेळी शहरातील वाहतूक नियंत्रणात असते, अशी भावना सॉफ्टवेअर कंपनीच्या संचालक आणि मोहिमेत सहभागी झालेल्या स्वयंसेवक अंजनी शुक्ला यांनी 'मिरर'शी बोलताना व्यक्त केली आहे. नागरिकांनी थोडासा समजूतदारपणा, संयम दाखवून लेनची शिस्त पाळल्यास वाहतूक अधिक चांगली होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. बालेवाडी हाय स्ट्रीट सिग्नलवर तैनात असलेल्या शुक्ला म्हणाल्या, आपण वाहतूक पोलिसांच्या भूमिकेचे कौतुक करायला हवे. औद्योगिक संस्थांनी पुढाकार घेत त्यांच्या सीएसआर उपक्रमाच्या माध्यमातून किमान संसाधनांच्या जोरावर वाहतूक व्यवस्थापन करणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी करायला हवे. वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेसंबंधित गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा व्हायला हव्यात.  

जर तुम्हाला पोलिसांना वाहतूक नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करायची असेल, तर  सीविक मिरर, पुणे टाइम्स मिरर आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांचा खास उपक्रम 'जरा देख के चलो'  तुम्हाला रस्ता नियंत्रक बनण्याची संधी देईल. शहरासाठी आणि वाहतूक व्यवस्थेसाठी काही तरी करण्याची ही तुमची संधी आहे. कारण केवळ तक्रार करणे पुरेसे नाही !  

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story