Man attacked with sickle : पिंपरीत भटक्या कुत्र्यावरून खुनी हल्ला

भटके कुत्रे अंगावर आल्याने त्याच्यावर ओरडणाऱ्या तरुणावर एकाने कोयत्याने खुनी हल्ला चढवला. पिंपरी कॅम्प परिसरात मंगळवारी (२५ एप्रिल) हा प्रकार घडला आहे. प्रवीण राजू शिरठाणे (वय २२, रा. पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सकलेन शेख (वय २७) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 28 Apr 2023
  • 01:21 am
श्वानाने लावली कळ बसे तिसऱ्यालाच झळ

पिंपरीत भटक्या कुत्र्यावरून खुनी हल्ला

भटक्या कुत्र्याला दिलेल्या शिव्या आपल्याला असल्याचा झाला गैरसमज झाल्याने भाजीविक्रेत्याने हमालावर केले कोयत्याचे वार

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

भटके कुत्रे अंगावर आल्याने त्याच्यावर ओरडणाऱ्या तरुणावर एकाने कोयत्याने खुनी हल्ला चढवला. पिंपरी कॅम्प परिसरात मंगळवारी (२५ एप्रिल) हा प्रकार घडला आहे. प्रवीण राजू शिरठाणे (वय २२, रा. पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सकलेन शेख (वय २७) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

प्रवीण हा हमालीचे काम करतो. तो पायी जात असताना पिंपरीच्या बाजारात एक भटका कुत्रा त्याच्या अंगावर धावून आला. त्यामुळे प्रवीण त्या कुत्र्यावर ओरडला. तसेच त्याने कुत्र्याला शिव्या दिल्या. दरम्यान प्रवीणने आपल्याकडे पाहूनच शिवीगाळ केली असे समजून, शेखने त्याच्याशी भांडायला सुरुवात केली. शेखने प्रवीणला दमदाटी करीत शिवीगाळ केली. त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यानंतर शेखने प्रवीणच्या डोक्यात कोयत्याने वार केले. डोक्यात वार झाल्याने प्रवीण रक्तबंबाळ झाला. त्यानंतरही शेखने पुन्हा डोक्यात कोयता मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने हात मध्ये घातल्याने त्याच्या हातावर वार होऊन दोन बोटे तुटली.

या सगळ्या घटनेनंतर सकलेन शेखने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी प्रवीणला नागरिकांनी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. तेव्हा फिरस्ता असलेल्या भाजी विक्रेत्या शेखने प्रवीणवर हल्ला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून त्याचा शोध घेतला जात होता.

शहरातील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला किंवा अचानक अंगावर धाऊन आल्याने वाहनांचे अपघात झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. पिंपरी भाजी मंडई, कॅम्प परिसरात कचरा ठिकठिकाणी पसरल्याने तेथे भटक्या जनावरांची गर्दी झालेली असते. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अन्न शोधण्याच्या नादात भटक्या जनावरांनी नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकार देखील यापूर्वी अनेक वेळा घडले आहेत. त्याच बरोबर मध्यंतरी पोलिसांनी बेकायदा हत्यार बाळगणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. त्यासाठी पोलिसांना गुण देण्यात आले होते. त्यानंतरही कोयत्याने हल्ला करण्याचा प्रकार पिंपरी मार्केट परिसरात घडला आहे. दरम्यान, प्रवीणवर हल्ला करून पसार झालेला शेख पिंपरी परिसरात आल्याची माहिती मिळाल्याने सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनी शेखला अटक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

किरकोळ वादातून महिलेच्या अंगावर कुत्रा सोडला

कचरा वेचक महिलेला मारहाण करून तिच्या अंगावर पाळीव कुत्रा सोडण्यात आला. हा कुत्रा चावल्यामुळे ही महिला जखमी झाली आहे. कोथरूडमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लक्ष्मी दत्ता गायकवाड (वय ६५, रा. जयभवानीनगर, कोथरूड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सुप्रिया कांबळे (वय २३, रा. कोथरूड), हिच्यासह तिचा भाऊ आणि वडिलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मी गायकवाड या कचरा संकलित करण्याचे काम करतात.  त्यांनी कांबळे यांच्या घरातील कचरा उचलला नव्हता. तुम्ही कचरा का उचलला नाही, असा जाब तरुणीने त्यांना विचारला. तुम्ही तीन महिने कचरा उचलण्याचे पैसे दिले नाहीत, असे गायकवाड यांनी तिला सांगितले. या कारणावरून सुप्रियाने गायकवाड यांच्याशी वाद घातला. या वादानंतर कांबळे यांनी गायकवाड यांच्यावर कुत्रा सोडला. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story