सोन्याच्या दागिन्यांची बॅग रिक्षात विसरली, काही तासातच पोलिसांनी रिक्षावाल्याला शोधून काढलं

पुणे स्टेशनवरून रिक्षा घेऊन पार्श्वनाथ जैन मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या महिलेची सोन्याच्या दागिन्यांसह कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरली होती. मात्र, घटनेचे गांभिर्य समजताच खडक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे काही तासात रिक्षा चालकाला शोधून काढले. तसेच सदरचे सर्व दागिने आणि कागदपत्रे संबंधित महिलेला सुपूर्त केल्याने खडक पोलिसांनी कौतूक होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Thu, 27 Apr 2023
  • 04:11 pm

महिला मंदिरात दर्शनासाठी जाताना रिक्षात विसरली बॅग

महिला मंदिरात दर्शनासाठी जाताना रिक्षात विसरली बॅग

पुणे स्टेशनवरून रिक्षा घेऊन पार्श्वनाथ जैन मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या महिलेची सोन्याच्या दागिन्यांसह कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरली होती. मात्र, घटनेचे गांभिर्य समजताच खडक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे काही तासात रिक्षा चालकाला शोधून काढले. तसेच सदरचे सर्व दागिने आणि कागदपत्रे संबंधित महिलेला सुपूर्त केल्याने खडक पोलिसांनी कौतूक होत आहे.

पल्लवी कुणाल लुंकड ही ३९ वर्षीय महिला आज सकाळी पुणे स्टेशनवरून पार्श्वनाथ जैन मंदिरात दर्शनासाठी रिक्षाने जात होती. मात्र, या महिलेची बॅग रिक्षातच विसरली. या बॅगेत ४ तोळ्याचे गंठण आणि एक लाख वीस हजार रुपयांचा बेरर चेक त्याचबरोबर शाळेचे संस्थेचे फी रजिस्टर असा एकूण अंदाजे ३ लाख ४० हजार रुपये किमतीचा ऐवज होता.

या महिलेने तात्काळ मीठगंज पोलीस चौकीत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ चौकशीला सुरूवात केली. यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अवघ्या काही तासातच रिक्षा चालकाचा शोध लागला. त्यानंतर पोलिसांनी रिक्षा चालकाकडून घेऊन संबंधित बॅग घेऊन पल्लवी लुंकड यांच्या परत केली. अवघ्या काही तासातच या महिलेची बॅग पोलिसांनी परत केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story