पोलिसांनी दाखवले प्रसंगावधान, मुलीचे वाचले प्राण

संगम ब्रिजजवळ एक १९ वर्षांची मुलगी अस्वस्थपणे फिरत होती. आत्महत्येसाठी ती उडी मारण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती वाहतूक पोलिसांना समजली. त्यांनी तातडीने पुलावर धाव घेत तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यानंतर पोलिसांनी दोन महिलांची मदत घेऊन तिला शांत केले. त्यानंतर तिच्या घरच्यांचा शोध घेत तिला कुटुंबीयांच्या हवाली केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 4 Apr 2023
  • 12:59 am
पोलिसांनी दाखवले प्रसंगावधान, मुलीचे वाचले प्राण

पोलिसांनी दाखवले प्रसंगावधान, मुलीचे वाचले प्राण

संगम पूलावर आत्महत्येचा प्रयत्न; दोन महिलांकरवी घातली मुलीची समजूत

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

संगम ब्रिजजवळ एक १९ वर्षांची मुलगी अस्वस्थपणे फिरत होती. आत्महत्येसाठी ती उडी मारण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती वाहतूक पोलिसांना समजली. त्यांनी तातडीने पुलावर धाव घेत तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यानंतर पोलिसांनी दोन महिलांची मदत घेऊन तिला शांत केले. त्यानंतर तिच्या घरच्यांचा शोध घेत तिला कुटुंबीयांच्या हवाली केले.  

प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील (आरटीओ) संगम ब्रिजजवळ एक मुलगी रविवारी दुपारी दोनच्या सुमारास अस्वस्थपणे फिरत होती. ती आत्महत्येच्या प्रयत्नात असल्याचे दिसत होते. त्यावेळी जवळच बंडगार्डन पोलीस चौकीतील पोलीस हवालदार अधिकराव चव्हाण आणि शिवाजी कुचेकर कर्तव्य बजावत होते. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तिची आस्थेने विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र, ती त्यांच्या प्रश्नाला काहीच उत्तर देत नव्हती. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन महिलांना थांबण्याची विनंती केली. तसेच, त्या मुलीशी संवाद साधण्यास सांगितले. त्या महिलांनीही मुलीशी संवाद साधला. तिला शांत केले. त्यानंतर मुलीला आरटीओसमोर आणले. संगम ब्रिजवर फिरत असलेली तरुणी बी-फार्मच्या पहिल्या वर्षात शिकत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यामुळे तिलाही अभ्यासाचे दडपण आले की काय अशी चर्चा सुरू झाली होती.  

दरम्यान बंडगार्डन पोलीस ठाण्यातील दामिनी पथकातील यास्मिन खान घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी तिच्याशी संवाद साधत तिला आणखी शांत केले. तिच्याशी गोड बोलून घरच्यांचा मोबाईल क्रमांक मिळवला. तिला बोलते केले. त्यानंतर तिने ताडीवाला रस्ता येथील लुंबिनीनगर येथे राहण्यास असल्याचे सांगितले. दरम्यान, मुलगी घरातून निघून गेल्याने तिचे आई-वडील तिचा शोध घेत होते.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून मुलीचे मानसिक स्वास्थ्य बिघडलेले आहे. कोणीतरी आपला पाठलाग करते. आपल्याला ओढून नेते, असा आभास तिला होतो. तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिली. वाहतूक पोलीस उपायुक्त विजय मगर म्हणाले, पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत एका मुलीचे प्राण वाचवले आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story