पुण्यात पोलिसांचा धाक आला संपुष्टात

पुण्यात मागील काही दिवसांपासून वाहनांच्या तोडफोडीच्या घटना समोर येत आहेत. पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. वानवडी गावात परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्तांचे कार्यालय असून त्यांच्या शंभर मीटरवर ही घटना घडली असल्याने पोलिसांचा धाक संपला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 27 Mar 2023
  • 11:28 am
पुण्यात पोलिसांचा धाक आला संपुष्टात

पुण्यात पोलिसांचा धाक आला संपुष्टात

वानवडीत उपायुक्त कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर फोडली बारा वाहने

#वानवडी

पुण्यात मागील काही दिवसांपासून वाहनांच्या तोडफोडीच्या घटना समोर येत आहेत. पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. वानवडी गावात परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्तांचे कार्यालय असून त्यांच्या शंभर मीटरवर ही घटना घडली असल्याने पोलिसांचा धाक संपला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काही दिवसांपूर्वी येरवड्यातील कामराजनगर येथे गुरुवारी  (२३ मार्च) मध्यरात्रीच्या सुमारास गुंडांच्या टोळक्याने दहशत निर्माण करत दहा ते बारा दुचाकी गाड्यांची तोडफोड करून नुकसान केले होते. आता वानवडी गावठाणात दारूच्या नशेत टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या तोडफोडीचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहे. या व्हीडीओमध्ये चार ते पाच जणांनी हातात रॅाड आणि कोयते घेऊन रिक्षा आणि गाड्यांची तोडफोड केल्याचे दिसून येत आहे. दहशत निर्माण करण्यासाठी तरुणांकडून अशा प्रकारचा धुडगूस घालण्यात येत आहे. भीतीपोटी या प्रकाराची नागरिक तक्रार देण्यास तयार नाहीत. तक्रार नाही म्हणून वानवडी पोलीस कारवाई करण्यास तयार नाहीत.

पुणे शहरात दारू व गांजाच्या नशेत गाड्यांची तोडफोड तसेच दहशत पसरवण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मागील महिनाभरापासून येरवडा तसेच शहरातील प्रमुख भागांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वत: पोलीस कर्मचार्‍यांसोबत पेट्रोलिंगसाठी फिरत असतात. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. पण तरीही असे प्रकार घडत असल्याने सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story