Farmer forced for land registration : जमीन नावावर करुन देण्यासाठी शेतकऱ्याला केली बेदम मारहाण

जमीन नावावर करुन देण्यास नकार दिल्याने एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याचा गुन्हा हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई आणि साथीदारांवर पौड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. मुळशीतील दारवली गावातील ही घटना असून याप्रकरणी प्रदीप शिवाजी बलकवडे (वय ३५, रा. दारवली, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 3 Aug 2023
  • 11:13 am
जमीन नावावर करुन देण्यासाठी शेतकऱ्याला केली बेदम मारहाण

जमीन नावावर करुन देण्यासाठी शेतकऱ्याला केली बेदम मारहाण

हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाई आणि साथीदारांवर गुन्हा दाखल

#पुणे

जमीन नावावर करुन देण्यास नकार दिल्याने एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याचा गुन्हा  हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई आणि साथीदारांवर पौड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.  मुळशीतील दारवली गावातील ही घटना असून याप्रकरणी प्रदीप शिवाजी बलकवडे (वय ३५, रा. दारवली, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. धनंजय देसाई याच्यासह सहा जणांना अटक केल्याची माहिती पौड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली.

याप्रकरणी देसाई याच्यासह रमेश जायभाय, श्याम सावंत, रोहित यांच्यासह 10 ते 15 साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड परिसरातील दारवली गावात बलकवडे कुटुंबीय राहायला असून ते सचिन ठोंबरे यांच्या घरात बसले होते. त्यावेळी देसाईचे साथीदार घरात शिरले. देसाई यांच्या नावावर जमीन का करुन दिली नाही, अशी विचारणा करुन त्यांना धमकावले.

जमीन नावावर करुन दिली नाही तर तुझ्यासह कुटुंबीयांना ठार मारू अशी धमकी दिली. बलकवडे यांना आरोपी श्याम सावंतने पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केली. आरोपींकडे काठ्या, गज होते, असे बलकवडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.आरोपींनी गावातील नागरिकांना धमकावले. पोलिस निरीक्षक एस यादव तपास करत आहेत.

धनंजय देसाई याने बारा वर्षांपूर्वी पौड भागात अतिक्रमण करुन घर बांधले आहे. देसाई हिंदू राष्ट्र सेना चालवित असून त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर गु्न्हे दाखल झाले आहेत. गोशाळेच्या नावाखाली पाळीव जनावरे शेतात सोडून दिली जातात. देसाईला जाब विचारल्यास तो ग्रामस्थांना धमकावतो. संघटनेच्या नावाखाली तो समाजात जातीय तेढ निर्माण करतो. त्याने हुलावळेवाडीतील तरुणांना मारहाण केली होती, असे समस्त ग्रामस्थ दारवलीकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, देसाईविरुद्ध कारवाई करण्यासाठी दारवली ग्रामस्थांनी बुधवारी पौड पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story