'टीसीएस'च्या अभियंत्याने आधी कुटुंबाला मग स्वतःला संपवले

औंध परिसरातील एका ४४ वर्षीय आयटी अभियंत्याने स्वतःच्या पत्नीचा आणि ८ वर्षांच्या मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. हे तिघे हरवल्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री दाखल झाली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 16 Mar 2023
  • 07:49 am
PuneMirror

'टीसीएस'च्या अभियंत्याने आधी कुटुंबाला मग स्वतःला संपवले

औंधमधील घटनेने आयटी क्षेत्र हादरले, मुलगा, पत्नीची हत्या करून केली आत्महत्या

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

औंध परिसरातील एका ४४ वर्षीय आयटी अभियंत्याने स्वतःच्या पत्नीचा आणि ८ वर्षांच्या मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. हे तिघे हरवल्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री दाखल झाली होती. 

सुदिप्तो गांगुली असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्याने पत्नी प्रियांका सुदिप्तो गांगुली (वय- ४०) आणि मुलगा तनिष्क सुदिप्तो गांगुली (वय-८ ) यांची हत्या करून आत्महत्या केल्याची प्राथमिक महिती आहे. आरोपीचा सुदीप्तोचा ‌भाऊ बंगळुरूमधील एका माहिती-तंत्रत्रान कंपनीत कामाला आहे. भावाशी संपर्क होत नसल्याने तो पुण्यात आल्यावर त्यांने घरातील सर्वजण बेपत्ता असल्याची तक्रार चतुः शृंगी पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता सुदिप्तोच्या मोबाईलचे लोकेशन घरातच आढळून आले. त्यानंतर घरी जाऊन तपास केल्यानंतर सगळेजण मृतावस्थेत आढळले. लहान मुलाच्या आणि पत्नीच्या तोंडाला प्लॅस्टिकची बॅग बांधलेली होती. त्यामुळे त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. सुदीप्तोने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. 

सुदिप्तो गांगुली हा टीसीएस कंपनीमध्ये आयटीआय अभियंता म्हणून कामाला  होता. मात्र तो टीसीएसमध्ये नेमक्या कोणत्या पदावर कामाला होता याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. एवढ्या मोठ्या कंपनीत काम करत असलेल्या व्यक्तीने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. शिवाय त्यांनी मुलाची आणि पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत: आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 

सुदिप्तोच्या भावाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध घेतला असता घरातच सगळ्यांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर त्यांच्या भावाला धक्का बसला. पोलीस आणि कुटुंबीय घटनेमागचे नेमके कारण शोधत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story