Fire brigade rescues dog : डांबरात अडकलेल्या श्वानांची अखेर सुटका

डांबर असलेल्या ड्रममध्ये अडकलेल्या दोन श्वानांची अग्निशमन दलाच्या जवानांनी रविवारी सुटका केली. कोंढवा भागातील सोसायटीच्या परिसरात ही घटना घडली. कोंढवा भागातील पारगेनगर परिसरात डीएसके सोसायटी आहे. सोसायटीच्या मागील बाजूस डांबर ठेवलेल्या ड्रममध्ये दोन श्वान अडकल्याची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 31 Jul 2023
  • 01:19 am
डांबरात अडकलेल्या श्वानांची अखेर सुटका

डांबरात अडकलेल्या श्वानांची अखेर सुटका

'सर्क्युलर सॉ' उपकरणाचा वापर करून कापला ड्रम; कोंढवा भागातील पारगेनगर परिसरातील डीएसके सोसायटीतील प्रकार

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

डांबर असलेल्या ड्रममध्ये अडकलेल्या दोन श्वानांची अग्निशमन दलाच्या जवानांनी रविवारी सुटका केली. कोंढवा भागातील सोसायटीच्या परिसरात ही घटना घडली. कोंढवा भागातील पारगेनगर परिसरात डीएसके सोसायटी आहे. सोसायटीच्या मागील बाजूस डांबर ठेवलेल्या ड्रममध्ये दोन श्वान अडकल्याची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

परिस्थितीचे गांभीर्य पाहून जवानांनी 'वाईल्ड ॲनिमल्स अँड स्नेक प्राेटेक्शन सोसायटीचे' अध्यक्ष आनंद अडसूळ यांच्याशी संपर्क साधला. या संस्थेचे दोन सदस्य तेथे पोहोचले होते. जवानांनी शक्कल लढवून 'सर्क्युलर सॉ' अग्निशमन उपकरण वापरून ड्रमचे दोन भाग केले. त्यानंतर अग्निशमन वाहनातील बचाव साहित्य, तेलाचा वापर करत तासाभरात दाेन्ही श्वानांची सुखरूप सुटका केली.

कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रातील तांडेल नीलेश लोणकर, वाहनचालक दीपक कचरे तसेच जवान रवी बारटक्के, सागर इंगळे, अनिकेत गोगावले, मनोज गायकवाड, संतोष माने आणि 'वाईल्ड ॲनिमल्स अँन्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटी' चे सदस्य लक्ष्मण वाघमारे, संदेश रसाळ यांनी ही कामगिरी केली. स्थानिक रहिवासी प्रतिभा पवार यांनी अग्निशमन दलाकडे वेळीच माहिती दिल्याने अग्निशमन दल, प्राणी मित्र संस्थेने श्वानांची सुटका वेळेवर केल्याने दाेन श्वान बचावले.

कोंढवा अग्निशामक दलाचे फायरमन रवी बारटक्के म्हणाले, "श्वानांच्या अंगाला खूप मोठ्या प्रमाणावर डांबर असल्याने ते इतरत्र चिटकत होते. त्यामुळे त्यांच्यावरील पुढील उपचारांसाठी वाईल्ड ॲनिमल्स अँन्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे अध्यक्ष आनंद अडसुळ यांच्या ताब्यात हे दोन श्वान देण्यात आले आहेत."

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story