जे. जे. उद्यानाची दुरवस्था
पुणे लष्कर परिसरातील प्रसिद्ध जमशेटजी जीजीभाॅय (जे. जे.) उद्यानात मद्याच्या बाटल्यांचा खच पडला आहे. सर्वत्र कचरा साचला असून स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. बागेतील कारंजे पाच वर्षांपासून बंद आहे. खेळाचे साहित्य मोडकळीस आले आहे. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी उभारलेल्या पशू-पक्ष्यांच्या पुतळ्यांची अवस्था वाईट झाली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.