Bee attack : सिंहगडावर मधमाशांच्या हल्ल्यात कुटुंबातील दहा जण जखमी

सिंहगड किल्ला परिसरात एकाच कुटुंबातील दहा जणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडल्याचे शुक्रवारी समोर आले आहे. सिंहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेल्या खामगाव मावळ येथे ही घटना घडली. यामध्ये एकाच कुटुंबातील दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 29 Apr 2023
  • 02:00 am
सिंहगडावर मधमाशांच्या हल्ल्यात कुटुंबातील दहा जण जखमी

सिंहगडावर मधमाशांच्या हल्ल्यात कुटुंबातील दहा जण जखमी

जखमींवर किरकटवाडीतील रुग्णालयात उपचार सुरू

 

#डोणजे

सिंहगड किल्ला परिसरात एकाच कुटुंबातील दहा जणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडल्याचे शुक्रवारी समोर आले आहे. सिंहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेल्या खामगाव मावळ येथे ही घटना घडली. यामध्ये एकाच कुटुंबातील दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खामगाव मावळ येथील एकमेकांचे नातेवाईक असलेले दहा जण सांबरेवाडी येथील भवानी मातेच्या दर्शनासाठी गेले होते. या वेळी त्यांच्यावर मधमाशांनी अचानक हल्ला केला. मधमाशांचा हा हल्ला इतका तीव्र होता की, ते दहाही जण गंभीर जखमी अवस्थेत खाली कोसळले होते. गावातील काही नागरिकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या या दहा जणांना शोधून काढले आणि तातडीने किरकटवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या संपूर्ण घटनेची तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेची पोलीस प्रशासनाला तातडीने माहिती दिली आणि जखमी रुग्णांना गरज पडल्यास इतर रुग्णालयात हरवण्याची व्यवस्था करण्याचेही आदेश दिले आहेत.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story