गौण खनिजांच्या मदतीला ताडपत्री

वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक गौण खनिजाची वाहतूक करू नये आणि गौण खनिजाची वाहतूक करताना त्यावर ताडपत्रीचे आच्छादन करावे, असे आदेश पुण्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 4 Apr 2023
  • 01:04 am
गौण खनिजांच्या मदतीला ताडपत्री

गौण खनिजांच्या मदतीला ताडपत्री

कंटेनर्सना आच्छादन सक्तीचे, अपघात टाळण्यासाठी आरटीओचे आदेश, अन्यथा कारवाई करणार

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@vijayCmirror

वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक गौण खनिजाची वाहतूक करू नये आणि गौण खनिजाची वाहतूक करताना त्यावर ताडपत्रीचे आच्छादन करावे, असे आदेश पुण्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

वाळू, माती, मुरुम, खडी आदी गौण खनिजांची वाहतूक करताना त्यावर आच्छादन नसल्यास वाळू, खडी सांडत असते.  त्यावरून इतर वाहने घसरून 

अनेकदा अपघात होतात. त्याचबरोबर वाहनातून उडणारे धूलिकणदेखील अपघाताचे निमित्त ठरतात. मागून येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांमध्ये हे धूलिकण जात असल्याने अपघात होतात.  

मोटार वाहन कायदा १९८८  च्या कलम १३३ नुसार भार क्षमतेपेक्षा अधिक माल असलेले वाहन चालविणे, ते चालविण्यास प्रवृत्त करणे किंवा ते चालविणे हा गुन्हा आहे. गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असून रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहनचालकांनी सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पुणे-नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात दगडखाणी आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी खाणीतून उडणाऱ्या धुळीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी केल्या आहेत.  श्वसनाच्या आजारांबरोबरच तेथील पिकांचेही नुकसान झाले तसेच भूजलाची गुणवत्ता ढासळली होती.

वैतागलेल्या नागरिकांनी यापूर्वी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती. परंतु परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. यापूर्वी  प्रदूषण नियंत्रण मंडळाने वाघोली, लोणीकंद, भावडी या परिसरातील १०६ खाणींना विविध नियमांचे उल्लंघन केल्याच्या निकषांवर टाळे ठोकण्याची नोटीस दिली होती. अनेकांनी  ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून खाणींनी प्रदूषण नियंत्रणसंदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही.  

या खाणीतून होणाऱ्या हवेच्या प्रदूषणापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या कच्च्या रस्त्यातील धुळीमुळे जास्त प्रदूषण होते.  पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने तेथे काळजी घेतली जात नाही. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी वृक्षारोपणही केले जात नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story