अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे िहच्या मोठ्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाला असून नातेवाईकांनी तिच्या घातपाताची शक्यता वर्तवली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 14 Mar 2023
  • 11:23 am
अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू

अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे िहच्या मोठ्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाला असून नातेवाईकांनी तिच्या घातपाताची शक्यता वर्तवली आहे.

मधू मार्कंडेय असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या चेहऱ्यावर काही जखमा आढळल्या आहेत. या घटनेप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधू मार्कंडेय ही केक बनवण्याचे काम करायची. व्यवसाय मोठा करण्याच्या उद्देशाने ती आणि तिची मैत्रीण रविवारी भाड्याने रूम बघण्यासाठी गेल्या होत्या. तिथे मधूला अचानक चक्कर आल्याने खाली कोसळली. दातखिळी देखील बसल्याने मैत्रिणीने ती काढण्याचा प्रयत्न केला. मधूला तिच्या मैत्रिणीने तातडीने खासगी रुग्णालयात नेले. परंतु, तेथील डाॅक्टरांनी तिला महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील डॉक्टरांनी मधूला मृत घोषित केले. या सर्व प्रकरणावर मधूच्या नातेवाईकांनी तिचा घातपात झाल्याची शक्यता वर्तवली आहे. वाकड पोलिसांनी मात्र तिच्या शरीरावर गंभीर दुखापत नाही, असे सांगत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वाकड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मधूच्या मामाचा मुलगा संतोष पोकळे म्हणाला, ‘‘मधूचा घातपात झाला असावा, असा आमचा संशय आहे. पंधरा दिवसांपूर्वी तिच्या पतीचे निधन झालं असून ती दोन मुलांसह रहाटणीत राहात होती. तिच्यासोबत गेलेली मैत्रीण आम्हा कोणाला माहीत नाही. म्हणून आम्हाला तिच्या मृत्यूविषयी 

संशय आहे.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story