वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई
#विश्रांतवाडी
विश्रांतवाडी भागात वाहतूक शाखेतील एका पोलीस कर्मचाऱ्याने मद्याच्या नशेत दहशत माजविल्याची घटना उघडकीस आली. भर रस्त्यात तलवार उगारून दहशत माजविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याच्या विरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय ऊर्फ करण लक्ष्मण जाधव असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. जाधव मुंढवा वाहतूक शाखेत नियुक्तीस आहे. धानोरीतील जाणता राजा चौकात जाधव तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील पथकाला मिळाली. पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याच्या विरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जाधव याची चौकशी करण्यात आली. जाधव याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याने त्याला निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.