प्रेमसंबंधातील फसवणुकीमुळे तरुणीची आत्महत्या

विवाहित असताना तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक केल्याने तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात घडली. या प्रकरणी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) एका जवानाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 30 Mar 2023
  • 11:17 am
प्रेमसंबंधातील फसवणुकीमुळे तरुणीची आत्महत्या

प्रेमसंबंधातील फसवणुकीमुळे तरुणीची आत्महत्या

विवाहाचे आमिष दाखवून ठेवले संबंध; 'एनडीए'तील जवानाविरुद्ध गुन्हा दाखल

#उत्तमनगर

विवाहित असताना तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक केल्याने तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात घडली. या प्रकरणी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) एका जवानाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका विवाहित जवानाने उत्तमनगर परिसरातील तरुणीसोबत विवाहाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध ठेवले. तरुणीने विवाहासंबंधी विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणाने जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी गुरिंदर सिंग (वय ३५ रा. एनडीए क्वार्टर, खडकवासला) याला अटक करण्यात आली. याबाबत तरुणीच्या भावाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गुरिंदर सिंग विवाहित होता. तो लष्करात जवान असून त्याची नियुक्ती राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत करण्यात आली आहे.

सिंग एनडीएच्या वसाहतीत राहायला आहे. उत्तमनगर भागातील २१ वर्षीय तरुणीची सिंग याच्याशी ओळख झाली होती. त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तिला विवाहाचे आमिष दाखविले होते. तरुणीने त्याला विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने राहत्या घरात प्रसाधनगृहात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीच्या भावाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर सिंग याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. चवरे तपास करत आहेत.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story