मदतीसाठी विद्यार्थी उतरले रस्त्यावर!
पुणे शहराच्या अनेक भागाला पावसाचा जोरदार तडाखा बसत असताना पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी निर्धाराने पुढे आले होते ते ‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’ने पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने सुरू केलेल्या ‘जरा देख के चलो’ या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होण्यासाठी. मद्यपान करून वाहन चालवू नका, तरुणींनो हेल्मेट वापरा, त्यातही तुम्ही सुंदर दिसता, झेब्रा क्रॉसिंगचा आदर करा, अशा आशयाचे संदेश नागरिकांपर्यंत पोहचवण्यात ते यशस्वी झाले. कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रोडवरील एबीसी चौकात वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरलेले हे स्वयंसेवक पादचाऱ्यांशी संवाद साधत त्यांना वाहतूक नियमांचे महत्त्वही समजावून सांगत होते.
‘जरा देख के चलो’ प्रेझेंटेड बाय ग्रॅव्हिट्टस फाऊंडेशन, को पॉवर्ड बाय द मिल्स पुणे आणि सेलेबिलिटी, इन असोसिएशन विथ न्याती समूह. कॅम्पेन सपोर्टेड बाय लोकमान्य सहकारी सोसायटी आणि शिवतारा प्रॉपर्टीज. कॅम्पेनचे नॉलेज पार्टनर कुश चतुर्वेदी आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.