तोतया आयपीएस बन्सलचे टोपी घालणे सुरूच

तोतया आयपीएस अजयकुमार बन्सल याचे पिंपरी-चिंचवड शहरातील उच्च शिक्षित तरुणांना टोप्या घालण्याचे सत्र अद्याप सुरूच आहे. तुमच्या फोटोचा वापर आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाऊ शकतो, अशी भीती दाखवत याच बन्सलने नव्याने एका युवतीला तब्बल सहा लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 5 Apr 2023
  • 09:23 am
तोतया आयपीएस बन्सलचे टोपी घालणे सुरूच

तोतया आयपीएस बन्सलचे टोपी घालणे सुरूच

एका युवतीकडून सहा लाख लुबाडल्याचे नवे प्रकरण उघडकीस

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

तोतया आयपीएस अजयकुमार बन्सल याचे पिंपरी-चिंचवड शहरातील उच्च शिक्षित तरुणांना टोप्या घालण्याचे सत्र अद्याप सुरूच आहे. तुमच्या फोटोचा वापर आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाऊ शकतो, अशी भीती दाखवत याच बन्सलने नव्याने एका युवतीला तब्बल सहा लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

रमा विजय खंडकर (वय ३१, रा. रावेत) असे फसवणूक झालेल्या उच्च शिक्षित युवतीचे नाव असून, खंडकर यांनी याविरुद्ध फिर्याद दिली आहे. सायबर ठग आधारकार्डवरील फोटो आणि क्रमांकाच्या आधारे नागरिकांना निराधार करू लागले असून, पोलिसांना या तोतया आयपीएस बन्सलचा अद्याप शोध लावता आलेला नाही.

शहरात सुरुवातीला हिंजवडी परिसरातील ‘तुमच्या नावाने परदेशात पार्सल पाठविण्यात आले असून, त्यामध्ये काही अवैध वस्तूंचा समावेश होता. पोलीस कारवाई करायची असून, तुमचा त्यात अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून येत असल्याने तुम्ही अंधेरी मुंबई येथे या...’ अशा स्वरूपाचे फोन सध्या आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांना येत आहेत. या प्रकारे एका अभियंता तरुणीला आर्थिक गंडा घालण्यात आला आहे. गेल्या महिनाभरात सायबर ठगांनी नवी मोडस वापरत लोकांना फसविण्यास सुरुवात केली आहे.

ऋतिका किरण हेगे (वय २७, सध्या रा. हिंजवडी फेज १) यांनीही या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी राहुलकुमार आणि पोलीस असल्याचे सांगणाऱ्या अजयकुमार बन्सल या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचप्रमाणे स्मिता जोशी नामक अन्य एका तरुणीसह अभिषेक काळे यांनादेखील अशाचप्रकारे गेल्या महिनाभरात फोन आले होते.

ऋतिका यांना फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ९ आकडी नंबरवरून एक फोन आला. राहुलकुमार या नावाने फोन करणाऱ्याने तो कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे ऋतिका यांना सांगितले होते. ‘‘तुम्ही तैवान येथे एक पार्सल पाठविले होते. ते तैवान कस्टम डिपार्टमेंटने अडविले आहे. या पार्सलमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू असल्याने तुमच्यावर अंधेरी मुंबई येथे सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,’’ अशी बतावणी त्याने केली होती.

मात्र, त्यानंतर पुन्हा पारुल चंद्रगुप्त शर्मा (वय २७, सध्या रा. निगडी प्राधिकरण) यांची ९ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. आता रमा यांना ६ लाख रुपयांना गंडा घालण्यात आलावारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पोलीसदेखील बुचकळ्यात पडले आहेत. सायबर ठग नव्या पद्धती वापरून फसवणूक करीत असल्याने त्याला आळा घालताना पोलिसांनादेखील अनेक अडचणी येत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story