'सिग्नल तोडेगा तो आगे तेरी मौत है !'
मी गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक नियंत्रणाचे काम करत आहे. त्यामुळे परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलल्याचेही मी पाहिले आहे. मी माझ्या रिकाम्या वेळेत आठवड्याच्या शेवटी स्वयंसेवक म्हणून काम करायचो. कुठे एखाद्या वाहनात बिघाड झालेला दिसला की प्रत्येक वेळी मदतीला धावून जायचो. मी येरवडा येथील मेंटल हॉस्पिटलच्या कोपऱ्यात थांबून वाहतूक व्यवस्थापनासाठी मदत केली. त्यासाठी मला येरवडा पोलीस ठाण्याचे मोठे सहकार्य मिळालेले आहे.
आता इतक्या वर्षांत रस्ते अरुंद झाले आहेत तर घरटी वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे मला वाटते की, लोकांनी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करायला हवा. आपले वाहतूक पोलीस दिवस-रात्र वाहतुकीला शिस्त लावताना दिसतात, त्यामुळे आता आपणच नागरिक म्हणून अधिक जबाबदारीने वागायला हवे.
सूचनाफलकांवरील आकर्षक ओळी आणि ‘सिग्नल तोडेगा तो आगे तेरी मौत है!’ सारख्या घोषणा लोकांचे लक्ष वेधून घेतीलच शिवाय त्यांच्यात अपघाताबद्दलची भीती निर्माण करतील, त्यांच्यात वाहनचालक म्हणून जबाबदारीची जाणीव निर्माण होईल.
जेव्हा वाहतूक पोलीस समोर असतात तेव्हा वाहनचालक शहाण्यासारखे वागतात त्यामुळे वाहतुकीला शिस्त राहते. मात्र त्यांच्या गैरहजेरीत गोंधळ माजत असतो. ऐन गर्दीच्या वेळी वाहतुकीची कोंडी वाढते. काही दिवसांपूर्वी एखाद्या चौकात एक वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पुरेसा ठरत असे. मात्र वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या लक्षात घेता एकाच सिग्नलवर दोन अथवा तीन वाहतूक पोलीस दिसून येतात.
जर लोक अधिक प्रमाणात 'देख के चलो' सारख्या अभियानात सहभागी झाले तर वाहतूक पोलिसांना मदतीचा हात मिळेल. यापेक्षा अधिक प्रमाणात स्वयंसेवक मिळाल्यास शहरातील वाहतुकीला संपूर्ण शिस्त लागेल.
- तन्मय ठोंबरे यांच्याशी झालेल्या संवादानुसार
('जरा देख के चलो' हे ग्रॅविट्स फाऊंडेशन प्रस्तुत, द मिल्स पुणे आणि सेलॅबिलिटी सह-संचालित आणि न्याती ग्रुपच्या सहकार्याने आहे. लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि शिवतारा प्रॉपर्टीज यांच्या सहकार्याने हे अभियान राबवले जात आहे. या मोहिमेचे नॉलेज पार्टनर कुश चतुर्वेदी आहेत. )
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.