शिवसेनेच्या श्याम देशपांडेंनी केला भाजपमध्ये प्रवेश

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. मात्र त्यापूर्वीच त्यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी शहराध्यक्ष श्याम देशपांडे यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 15 Mar 2023
  • 11:24 am
शिवसेनेच्या श्याम देशपांडेंनी  केला भाजपमध्ये प्रवेश

शिवसेनेच्या श्याम देशपांडेंनी केला भाजपमध्ये प्रवेश

ठाकरे गटाला मोठा धक्का; फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

#पुणे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. मात्र त्यापूर्वीच त्यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी शहराध्यक्ष श्याम देशपांडे यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ हे यावेळी उपस्थित होते. श्याम देशपांडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. पुणे महापालिकेत शिवसेनेकडून दोन वेळा नगरसेवक होते.  त्यांच्या पत्नी संगीता देशपांडे दोन वेळा नगरसेविका होत्या.  २००८-२००९ मध्ये देशपांडे यांनी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. २०१२-२०१४ या कालावधीत ते पुणे शहर शिवसेनेचे प्रमुख होते. गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली होती. त्या नंतर त्यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत विनोद गायकवाड, नारायण पाटील, समीर भट, अनिल हिंगमिरे, लक्ष्मण क्षीरसागर, नामा देडे, महेंद्र आढाव, गोविंद चव्हाण, विजय कोलसे, तुषार गाढवे, अनिल मरळ, सुरेश कुलकर्णी या कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मागील काही महिन्यांपासून ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगलीच गळती लागली आहे. एकामागून एक नेते भाजपमध्ये किंवा शिंदे गटात सामील झाल्याचे  बघायला मिळत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसल्याचे दिसून येते आहे. त्यात आता माजी नगरसेवक  श्याम देशपांडे यांनी जाहीर भाजपमध्ये प्रवेश घेतल्यामुळे ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने २०२२ मध्ये श्याम देशपांडे यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करत त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story