'शिंदे'शाहीची शाळा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी पुणे दौऱ्यावर दौरा होते. कसबा पेठ पोटनिवडणूक प्रचारासाठी त्यांचे अनेक कार्यक्रम होते. धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह आणि शिवसेना हे नाव परत मिळाल्यानंतर पुणे शहर शिवसेनेने शिंदे यांच्या स्वागताची तयारी केली होती. ज्या आरसीएम गुजराती शाळेत शिंदे यांचा मेळावा होता, त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत सोमवारी मुख्यमंत्री येणार म्हणून लवकर सोडण्यात आले होते, असे काही विद्यार्थ्यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले. तर शाळेतर्फे उद्या बारावीची परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना लवकर सोडल्याचे सांगण्यात आले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.