म्हणे 'मी शिंदेंचा पी. ए. बोलतोय'

मागील काही दिवसांपासून निनावी फोन किंवा फोन करून धमकावल्याचे प्रकार पुण्यात सातत्याने बघायला मिळत आहेत. स्पूफिंगॲपच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आता ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजय ठाकूर यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पी. ए. बोलतो आहे, असे सांगत ससूनमध्ये सुरू असलेल्या मेसचे दुसरे टेंडर भरा, असा आदेश त्यांना देण्यात आला असल्याचे समोर आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 5 Apr 2023
  • 09:32 am
म्हणे 'मी शिंदेंचा पी. ए. बोलतोय'

म्हणे 'मी शिंदेंचा पी. ए. बोलतोय'

ससूनच्या अधिष्ठात्यांना बनावट कॉल; मेसचे दुसरे टेंडर भरण्याचे दिले आदेश

#पुणे

मागील काही दिवसांपासून निनावी फोन किंवा फोन करून धमकावल्याचे प्रकार पुण्यात सातत्याने बघायला मिळत आहेत. स्पूफिंगॲपच्या माध्यमातून  फसवणुकीच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आता ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजय ठाकूर यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पी. ए. बोलतो आहे, असे सांगत ससूनमध्ये सुरू असलेल्या मेसचे दुसरे टेंडर भरा, असा आदेश त्यांना देण्यात आला असल्याचे समोर आले आहे.

डॉ. संजय ठाकूर यांनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालयात फोन करत खातरजमा केल्यावर त्यांना आलेला फोन बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान

या फोननंतर काही वेळासाठी ससून रुग्णालयात खळबळ उडाली होती. ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या लॅन्डलाईनवर हा फोन आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पी. ए. बोलतो आहे, असे सांगून फोन करणारा तब्बल पाच मिनिटे बोलत होता. त्या व्यक्तीने डॉ. ठाकूर यांच्याकडून सर्व माहिती घेतली आणि त्यांना अनेक सूचनाही केल्या. मात्र काही वेळानंतर संजीव ठाकूर यांना फोनबाबत संशय आला. त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकाराची खात्री करण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयात फोन केला. त्यानंतर त्यांना आलेला फोन फेक असल्याचे उघड झाले. या घटनेची माहिती अद्याप पोलिसांना देण्यात आलेली नाही.

पोलिसांकडे फेक कॉलबाबत तक्रार नाही

याबाबत संजीव ठाकूर म्हणाले की, फेक कॉल येण्यापूर्वीच काही तास आधी कँटिन समितीची बैठक घेतली होती. कँटिनच्या निविदेची मुदत संपल्याने ती बंद करणार असल्याविषयी त्यात चर्चा झाली होती. त्यानंतर फेक कॉलही नेमका याच संदर्भात आला होता. डॉ. संजीव ठाकूर यांनी अत्यंत हुशारीने हा सगळा प्रकार समोर आणला. या संपूर्ण फेक कॉल प्रकरणाची माहिती संजीव ठाकूर यांनी पोलिसांना दिली नाही. कारण या प्रकरणात वेळ घालवण्यापेक्षा आज ज्या नियोजित शस्त्रक्रिया आहेत त्या जास्त महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पोलिसांना या संदर्भात माहिती दिली नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याशी संपर्क साधला असता ही बाब आमच्याही निदर्शनास आली आहे. बोगस व्यक्तीने कॉल केला असल्याचे समजते आहे, अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे असे मंगेश चिवटे यांनी म्हटले आहे. 

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story