वाढीव वीजदराचा दरोडा

महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने महावितरण कंपनीला सुमारे ३९ हजार ५६७ कोटी रुपयांच्या दरवाढीला मान्यता दिली आहे. घरगुती आणि औद्योगिक वीज बिलात युनिट मागे सरासरी दीड रुपयांची वाढ होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 2 Apr 2023
  • 01:39 pm
वाढीव वीजदराचा दरोडा

वाढीव वीजदराचा दरोडा

घरगुती, औद्योगिक वीजदरात युनिटमागे सरासरी दीड रुपयांची वाढ, बिल १० ते ५० टक्क्यांनी वाढणार

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने महावितरण कंपनीला सुमारे ३९ हजार ५६७ कोटी रुपयांच्या दरवाढीला मान्यता दिली आहे. घरगुती आणि औद्योगिक वीज बिलात युनिट मागे सरासरी दीड रुपयांची वाढ होणार आहे.

ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. २०२३-२४ आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षांत दोन टप्प्यात दर वाढवण्यात येणार आहेत. घरगुती, औद्योगिक, कृषी, वाणिज्य अशा सर्वच क्षेत्रांना दरवाढीची झळ बसणार आहे. स्थिर आकार, वहन आकार, पॉवर फॅक्टर यामुळे उद्योगांच्या बिलात तब्बल ३३ ते ५० टक्के वाढ होणार असल्याचा दावा उद्योजकांकडून केला जात आहे. महावितरण कंपनीने विद्युत नियामक आयोगाकडे दोन आर्थिक वर्षांसाठी ६७ हजार ६४४ कोटी रुपयांची दरवाढ मागितली होती. त्यापैकी ३९.५६७ हजार कोटींच्या दरवाढीस मान्यता मिळाली. स्थिर आकार, वहन आकार आणि वीज बिल अशा सर्वच प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वरवर वाढ जरी दीड रुपया दिसत असली तरी प्रत्यक्षात १० ते ५० टक्के दरवाढ होणार आहे.

पहिल्या वर्षी ७.२५ टक्के आणि दुसऱ्या वर्षी १४.७५ टक्के अशी २१.६५ टक्के दरवाढ होईल. स्थिर आकार आणि इतर बाबी गृहित धरल्यास पहिल्या वर्षी सरासरी दहा आणि दुसऱ्या वर्षी २० टक्के अशी सरळसरळ ५० टक्के वाढ होणार आहे.

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे सचिव प्रताप होगाडे म्हणाले, ‘‘वीज नियामक आयोगाने जवळपास ५० टक्के दरवाढ मान्य केल्याचे दिसत आहे. आयोगाचा 

आदेश सामान्यांवर प्रचंड वीजदरवाढ लादणारा आहे. या निर्णयामुळे शेती, उद्योग, व्यापार व घरगुती ग्राहकांवर प्रचंड आर्थिक ताण येणार आहे.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story