सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला ६६ लाखांना गंडवले

पुणे जिल्ह्यातील भाेर परिसरात कमीत कमी दराने जमीन विकत घेऊन देतो, असे आमिष दाखवून एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला ६६ लाख रुपयांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त फत्तेसिंह नानासाहेब पाटील (वय ५९) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 29 Mar 2023
  • 12:38 pm
सेवानिवृत्त पोलीस  अधिकाऱ्याला ६६ लाखांना गंडवले

सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला ६६ लाखांना गंडवले

जमिनीच्या आमिषाने उकळले ६० लाख; धमकी देत पुन्हा ६ लाखांची लूट

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

पुणे जिल्ह्यातील भाेर परिसरात कमीत कमी दराने जमीन विकत घेऊन देतो, असे आमिष दाखवून एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला ६६ लाख रुपयांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त फत्तेसिंह नानासाहेब पाटील (वय ५९)  यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. स्वस्तात शेतजमीन विकत घेऊन देताे, असे सांगत फत्तेसिंह पाटील यांच्याकडून ६० लाखाची मागणी केली. पाटील यांनी शेतजमीन घेण्यासाठी पैसे दिले मात्र या प्रकरणी त्यांची फसवणूक करण्यात आली. त्यानंतर त्यांना धमकावून आर्थिक नुकसान केले जाईल, अशी भीती घालण्यात आली आणि आणखी त्यांच्याकडून सहा लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी पाटील यांनी तीन आराेपींनी फसवणूक केल्याचे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. पाटील हे आंबेगाव येथील मंत्री किशोर पार्क, भोसलेनगर येथे वास्तव्यास आहेत.  त्यांच्या राहत्या घरी ही फसवणूक करण्यात आली. पाटील यांच्या फिर्यादीनुसार राजेश अंकुश पाेटे, संदेश अंकुश पाेटे, प्रियांका नीलेश सूर्यवंशी या तीन आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम  ४२०, ३८४, ३४ नुसार आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे तीनही आरोपी कुदळे पाटील रेसिडेन्सी, वडगाव बुद्रुक या ठिकाणी राहात आहेत. जानेवारी २०१५ पासून ते फिर्याद दाखल करेपर्यंतच्या काळात पाटील यांची फसवणूक झाली आहे.

या तिघांनी फिर्यादी पाटील यांचा विश्वास संपादन केला. त्यांना भाेर परिसरात स्वस्त दरात चांगली शेतजमीन विकत घेऊन देताे, अशी हमी दिली.  त्यानुसार आरोपी आणि तक्रारदार हे  भोर येथील संबंधित शेतजमिनीची पाहणी करण्यास गेले होते. पाहणी करून आल्यानंतर आराेपींनी पाटील यांच्याकडून ६० लाख रुपये ती जमीन विकत घेण्यासाठी घेतले. परंतु त्यानंतर पाटील यांना काेणतीही जमीन मिळाली नाही. तसेच भाेसलेनगर येथील पाटील यांच्या राहत्या

घरी येऊन घेतलेले ६० लाख रुपये परत करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. व्यवसायात आर्थिक नुकसान करण्याची धमकी देत पाटील यांच्याकडून आणखीन सहा लाख रुपये उकळले. २०२१ साली ही घटना घडली. त्यानंतर पाटील यांनी जमीन द्यावी किंवा पैसे परत करावे अशी वारंवार मागणी आराेपींकडे केली. मात्र, आराेपी त्यांना सतत धमकावत राहिल्याने त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story