गुंगीचे औषध पाजून युवतीवर बलात्कार
# पुणे
बिअरमध्ये गुंगीचे औषध टाकून दोघांनी युवतीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, त्याच्या साथीदाराविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी मयूर दत्तात्रय सातव (वय २१, रा. आव्हाळवाडी, वाघोली, नगर रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार शशिकांत कदम (रा. शुभम सोसायटी, सोमनाथनगर, वडगाव शेरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका युवतीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी मयूर आणि युवती एकमेकांना ओळखतात. त्याने तिला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्याने तिला एका हाॅटेलमध्ये नेले. बिअरमध्ये गुंगीचे औषध टाकून युवतीला जबरदस्तीने बिअर पिण्यास भाग पाडले. त्यानंतर बेशुद्धावस्थेत युवतीवर मयूरने बलात्कार केला. त्याने मोबाइलवरून तिची छायाचित्रे काढली. छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी त्याने तिला दिली. त्यानंतर मयूरने त्याचा मित्र शशिकांत याच्याशी संबंध ठेवण्यासाठी युवतीला धमकावले. शशिकांतने तिच्यावर बलात्कार केला. आरोपींच्या धमकीमुळे घाबरलेल्या युवतीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करत आहेत.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.