रमजान ईद आणि अक्षय्य तृतीया उत्साहात
शनिवारी शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. लष्कर परिसरातील ईदगाह मैदानात मुस्लीम बांधवांनी रमझानची विशेष नमाज अदा केली, तर दुसरीकडे अक्षय्य तृतीया अर्थात साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभ दिवस असल्याने पुणेकरांनी सोने खरेदीस पसंती दिली. याशिवाय पुणेकरांचे लाडके दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात ११ हजार आंब्यांनी सजावट करण्यात आली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.