पोलिसांचे १२५ अोशो अनुयायांवर गुन्हे

पुण्यातील ओशो आश्रमाच्या बाहेर अनुयायांनी केलेले आंदोलन त्यांना चांगलेच महागात पडले असून आश्रमाच्या सुरक्षारक्षकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १०० ते १२५ ओशो अनुयायांवर गुन्हा दाखल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 24 Mar 2023
  • 08:10 am
पोलिसांचे १२५ अोशो अनुयायांवर गुन्हे

पोलिसांचे १२५ अोशो अनुयायांवर गुन्हे

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

पुण्यातील ओशो आश्रमाच्या बाहेर अनुयायांनी केलेले आंदोलन त्यांना चांगलेच महागात पडले असून आश्रमाच्या सुरक्षारक्षकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १०० ते १२५ ओशो अनुयायांवर गुन्हा दाखल केला आहे.

कोरेगाव पार्क परिसरातील ओशो आश्रमात माळ घालून प्रवेश करण्यावरून बुधवारी (२२ मार्च) ओशोभक्त आणि पोलिसांच्यात वादावादी झाली होती. यावेळी आत जात असताना भक्तांकडून सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की करण्यात आली होती. या प्रकरणी गुरुवारी पुण्यातील कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये १२५ ओशो भक्तांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता ओशो आश्रमाच्या सुरक्षारक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून शंभर ते १२५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील ओशो आश्रमात बुधवारी राडा झाला होता. तसेच ओशोंच्या अनुयायांमध्ये आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याने या अनुयायांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. यामुळे आंदोलन करणारे हे अनुयायी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आश्रमाच्या मालकीवरून त्यांचे अनुयायी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने ओशो आश्रम प्रशासन आणि ओशोच्या अनुयायांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे, पण अनुयायांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे बराच वेळ ओशो आश्रमात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुण्यातील ओशो आश्रमाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर ओशोंचे अनुयायी आश्रमाजवळ गोळा झाल्याने परिस्थिती चिघळली, तसेच त्यांनी सुरक्षारक्षकांना डावलून आश्रमात प्रवेश केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. यावेळी पोलिसांनी अनेक अनुयायांना ताब्यातदेखील घेतले.

ओशो आश्रमात होत असलेल्या भ्रष्टाराच्या विरोधात ओशोंच्या अनुयायांकडून आंदोलन सुरू आहे. तसेच या अनुयायांना आश्रमात जाऊ दिले जात नसल्याने गेल्या काही दिवसांपासून आश्रमाबाहेर त्यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काल त्यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर एकत्र आले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story