यशवंतराव चव्हाण पूल २९ फेब्रुवारी पर्यंत बंद
पुणे: कर्वे रस्ता (Karve Road) आणि शास्त्री रस्त्याला (Shastri Road) जोडणारा तसेच फक्त दुचाकी वाहनांसाठी पूना हाॅस्पिटल नजीक असलेला यशवंतराव चव्हाण पूल (Yashwantrao Chavan Bridge) धोकादायक झाला आहे. या पुलाचे काम आजपासून सुरु हाेत आहे. परिणामी २९ फेब्रुवारीपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दुचाकी वाहनांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पुणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी केले आहे. (Pune News)
पुण्यातील पूना हॉस्पिटल शेजारी असलेला यशवंतराव चव्हाण पूल हा पूल धोकादायक झाला आहे. पुणे महापालिकेने या पुलाचे ऑडिट केले होते. यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या पुलाचे बेअरिंग आणि सस्पेंशन जॉइंट बदलण्याचे काम करण्यात येणार आहे.
या कामासाठी हा पूल २ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन महापालिका तसेच वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शास्त्री रस्त्यावरून कर्वेनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी गांजवे चौक येथून टिळक चौक-छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल) खंडोजीबाबा चौकाच्या मार्गाचा वापर करावा. कर्वे रस्त्यावरून आलेल्या वाहनांनी खंडोजीबाबा चौक छत्रपती संभाजी महाराज पुलावरून टिळक चौकातून इच्छित स्थळी जावे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.