पुणे विद्यापीठाच्या मेसमधील जेवणात पुन्हा एकदा सापडला 'किडा', विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक ८ मधील एका विद्यार्थ्याच्या जेवणात किडा सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवल्यानंतर त्या विद्यार्थ्याला मळमळत असल्याची माहिती मिळत आहे. 

पुणे विद्यापीठातील मेसच्या जेवणाच्या ताटात पुन्हा एकदा आढळला 'किडा'

श्रेयस वांगे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) वसतिगृह क्रमांक ८ मधील एका विद्यार्थ्याच्या जेवणात किडा सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवल्यानंतर त्या विद्यार्थ्याला मळमळत असल्याची माहिती मिळत आहे. 

विद्यापीठात पुन्हा एकदा जेवणात किडा सापडण्याचा प्रकार घडला आहे. यापूर्वीही असे प्रकार वारंवार घडल्याचे समोर आले होते. त्याविरोधात विद्यापिठातील विद्यार्थ्यानी वेळोवेळी आंदोलन करत आवाजही उठवला. परंतु तरीही असे प्रकार बंद होण्याचं थांबताना दिसत नाहीये.  (poor quality food in pune university)

घडलेल्या प्रकाराबाबत विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती तथा भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समितीचे सदस्य राहुल ससाणे यांनी म्हटले की, आज थोड्या वेळापूर्वी वसतिगृह क्रमांक ८ (मुलांचे) येथील मेसमधून एका विद्यार्थ्याचा फोन आला. विद्यार्थी तक्रार करत होता की , 'त्यांच्या जेवणाच्या ताटात एक किडा सापडला आहे. सर मी जेवण केले आहे.  आता मला खूप मळमळ होते आहे. अजून किती दिवस आम्ही हे असे किडे, झुरळाचे निकृष्ट अन्न खायचे आहे'? 

ससाणे पुढे म्हणाले,  भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समितीचा सदस्य या नात्याने मी सातत्याने या निकृष्ट जेवणाच्या विरोधात आवाज उठवत आलो आहे. परंतु कोणत्याही प्रकारची ठोस धोरणात्मक उपायोजना झालेली दिसत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अशाच प्रकारचे निकृष्ट अन्न विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांना दिले जाते. दरवर्षी विद्यार्थी येतात जातात परंतु या जेवणाच्या दर्जामध्ये कसल्याही प्रकारचे परिवर्तन झाल्याचे दिसत नाही. या अगोदर झालेल्या घटनांच्या संदर्भात अनेक वेळा वेगवेगळ्या माध्यमांमधून त्याच्या बातम्या छापून आल्या, आंदोलने झाली. वेगवेगळ्या समित्या गठीत झाल्या परंतु परिवर्तन मात्र झाले नाही. ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यासारख्या शहरांमध्ये येतात आणि त्यांच्या वाट्याला असे हे निकृष्ट जेवण येते. आतापर्यंत घडलेल्या एकूण सर्व घटना आणि संबंधित घटना याचा विचार करता लवकरच आम्ही विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने यूजीसी आणि विद्यापीठाचे मूल्यांकन करणाऱ्या नॅक (NACC) सह इतर सर्व संस्थांकडे लेखी स्वरुपात तक्रार अर्ज देणार आहोत. आमची कायमस्वरूपीची एकच मागणी आहे ती म्हणजे विद्यापीठामध्ये सर्व विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न मिळाले पाहिजे. हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest