पुणे: लोकसेवा पब्लिकेशनच्या लढ्याला अखेर यश; भगीरथ प्रकाशनाचा दावा फेटाळला

लोकसेवा पब्लिकेशनने प्रकाशित केलेली भारतीय अर्थव्यवस्था आणि राज्यघटना या क्लास नोट्ससाठी भगीरथ प्रकाशनाच्या रंजन कोळंबे यांच्या पुस्तकातील मजकूर घेतला, असा आरोप करुन भगीरथने लोकसेवा पब्लिकेशनच्या विरोधात कमर्शियल सूट दाखल केला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 23 Jun 2024
  • 10:22 pm

लोकसेवा पब्लिकेशनच्या लढ्याला अखेर यश

लोकसेवा पब्लिकेशनने (Lokseva Publication) प्रकाशित केलेली भारतीय अर्थव्यवस्था आणि राज्यघटना या क्लास नोट्ससाठी भगीरथ प्रकाशनाच्या रंजन कोळंबे यांच्या पुस्तकातील मजकूर घेतला, असा आरोप करुन भगीरथने लोकसेवा पब्लिकेशनच्या विरोधात कमर्शियल सूट दाखल केला होता. मात्र भगीरथने केलेल्या दाव्यानुसार न्यायालयात पुरावे सादर करु न शकल्याने त्यांचा दावा फेटाळून लावला आहे. न्यायालयाने लोकसेवाच्या बाजूने निकाल देत कोणाचाही मजकूर घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे. या निकालामुळे लोकसेवा पब्लिकेशनला मोठा दिलासा मिळाला असून आता त्यांना पुन्हा बाजारात आपल्या नोट्स आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले असून आनंद साजरा केला.

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय अर्थव्यवस्था आणि राज्यघटना या क्लास नोट्स आप्पा उर्फ हनमंत हातनूरे (Appa Hatnure) यांनी स्वतः लिहिलेली असून त्यात कोणत्याही स्वरुपाचे कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन झाल्याचे दिसत नाही, असे निरीक्षण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुनील जी. वेदपाठक यांनी नोंदवले आहे. यासंदर्भात शुक्रवारी पत्रकार परिषदेत लोकसेवा पब्लिकेशनचे लेखक आप्पा हातनुरे, संपादक साईनाथ डहाळे, प्रा. शरद गायके, ऍड. अभिजीत देसाई यांनी ही माहिती दिली.

लोकसेवा प्रकाशनाने प्रसिध्द केलेल्या क्लास नोट्सला स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये अल्पकाळातच पसंतीस उतरल्या होत्या. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात या नोट्स होत्या. स्पर्धा परीक्षेत भगीरथच्या पुस्तकांची असलेली मक्तेदारी लोकसेवाने मोडकळीस आणली होती. त्यांच्या पुस्तकांचा खप मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. या भीतीपोटी भगीरथने लोकसेवाच्या विरोधात कमर्शियल सूट दाखल केला होता. या दरम्यानच्या काळात समाज माध्यमात आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रात लोकसेवाच्या पुस्तकांची बदनामी केली होती. मात्र आमची बाजू खरी होती. स्पर्धा परीक्षांसाठी केलेला अभ्यास आणि त्यातून मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नेमके काय हवे याचा विचार करुन नोट्स तयार केल्या होत्या. त्या विद्यार्थ्यांना आवडल्या तसेच याचा परीक्षेत मोठा फायदा झाला. कमी वेळेत अधिक अभ्यास होऊ लागला आहे. त्यामुळेच विद्यार्थी या नोट्स विकत घेतात. मात्र ही बाब भगीरथला खुपल्याने त्यांनी खोटा दावा केला होता. केलेल्या दाव्यानुसार त्यांना पुरावे देखील सादर करता आले नाहीत. आमच्याकडे असलेले पुरावे दाखले केले, कॉपी राईटस दाखल केले. त्यामुळे न्यायालयाने खरी बाजू ऐकून आमच्या बाजूने निकाल दिला. असे हातनूरे यांनी सीविक मिररला सांगितले.

साईनाथ डहाळे व आप्पा हातनूरे म्हणाले, लोकसेवा पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकांत रंजन कोळंबे यांच्या पुस्तकातील मजकूर घेऊन क्लास नोट्स लिहिल्याचा आरोप भगीरथ प्रकाशनाकडून करण्यात आला होता. मात्र, कोळंबे यांच्या पुस्तकातील कोणत्याही स्वरुपाचा मजकूर आम्ही कॉपी केलेला नव्हता. लोकसेवा पब्लिकेशनने प्रकाशित केलेली क्लास नोट्स भारतीय अर्थव्यवस्था आणि क्लास नोट्स राज्यघटना ही दोन्हीही पुस्तके हातनूरे यांनी आपल्या २०१२ ते २०२४ पर्यंतच्या अभ्यासातून तसेच एमपीएससीच्या १० ते १२ पूर्व परीक्षा व काही मुख्य परीक्षा पास झालेल्या अनुभवातून लिहिलेल्या आहेत. तरीही भगीरथने कमर्शियल सूट दाखल करत लोकसेवा पब्लिकेशनच्या पुस्तकांवर बंदी आणण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तात्पुरत्या स्वरुपात पुस्तकावर बंदी घालून आमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेळ दिला. त्यानुसार, यासंदर्भातील सर्व पुरावे, कॉपीराईट प्रमाणपत्रे आम्ही न्यायालयाला सादर केली. याउलट भगीरथ प्रकाशन एकही पुरावा देऊ शकले नाही.

परिणामी, ही पुस्तके कॉपीराईट कायदा १९५७ कलम ५१ अन्वये संरक्षित असल्याचे कायद्यानुसार प्रस्थापित आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवत ही बंदी उठवली. तसेच 'शब्द न शब्द कॉपी केल्याचा कोळंबे यांचा आरोप पुराव्यामध्ये आढळून आला नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे लोकसेवा पब्लिकेशनची पुस्तके अथवा क्लास नोट्स या अधिकृत आहेत.

लोकसेवाचे म्हणणे... 
- भारतीय अर्थव्यवस्था व भारतीय राज्यघटना आणि प्रशासन या दोन्ही पुस्तकाच्या कॉपीटाईटचे मूळ प्रमाणपत्र सादर करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी केवळ भारतीय अर्थव्यवस्था या पुस्तकाच्या प्रमाणपत्राचे झेरॉक्स प्रत सादर केली.

- दुसऱ्या पुस्तकाचे प्रमाणपत्र ते सादर करू शकले नाहीत, हेही न्यायालयाने सुनावणी करताना अधोरेखित केले आहे. लोकसेवाकडे दोन्ही पुस्तकांचे कॉपीराईट प्रमाणपत्रे आहेत.

- व्यावसायिक स्पर्धेतून लोकसेवा अकॅडमी (Lokseva Academy) व पब्लिकेशन नेहमीच गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी कार्य करत असते. त्यांनी २०१७ पासून ते २०२४ पर्यंत हजारो विद्यार्थ्यांना आपल्या क्लासेसमध्येमोफत प्रवेश दिले आहे. तसेच शिष्यवृत्ती योजना राबवली जाते.

- लोकसेवाची पुस्तकें व नोट्स महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

- त्यांची शिकवण्याची पद्धत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समजेल अशी आहे. यामुळे ते अल्प कालावधीमध्ये विद्यार्थीप्रिय झाले त्यामुळेच या व्यावसायिक द्वेशातून भगीरथ पब्लिकेशनने लोकसेवा अकॅडमी व पब्लिकेशन वर खोटे आरोप करून लोकसेवाचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्याला समजेल अशा या नोट्स तयार केलेल्या आहेत. राज्यघटना आणि भारतीय अर्थव्यवस्था या विषयाच्या नोट्स तयार करण्यासाठी संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करुन तसेच चालू घडामोडींवर लक्ष ठेवून त्यानुसार नोट्स तयार केल्या आहेत. हे दोन विषय प्रत्येकासाठी खुले असतात, त्यामुळे कोणाचा मजकूर घेण्याचा विषय येतच नाही. खोटा दावा करुन लोकसेवाला बदनाम करण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र न्यायालयाच्या निर्णयाने सर्व चित्र स्पष्ट झाले आहे.
- आप्पा हातनुरे, लोकसेवा पब्लिकेशनचे लेखक

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest