पुणे: नीट, नेट परीक्षा भ्रष्टाचाराच्या विरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पुणे: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुरोगामी विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने NEET ते NET मधील भ्रष्टाचाराच्या विरोधात आज (दि 25. जून) आंदोलन करण्यात आले. गेल्या वर्षभरामध्ये संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या पेपर फुटीच्या घटना घडलेल्या आहेत.

NEET Scam

पुणे: नीट, नेट परीक्षा भ्रष्टाचाराच्या विरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पुणे:  पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुरोगामी विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने NEET ते NET मधील भ्रष्टाचाराच्या विरोधात आज (दि 25. जून) आंदोलन करण्यात आले. गेल्या वर्षभरामध्ये संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या पेपर फुटीच्या घटना घडलेल्या आहेत. नेट सारखी अत्यंत महत्त्वाची परीक्षेतील भ्रष्टाचार ताजा असताना लगेचच प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी नेट परीक्षा रद्द करण्यात या सरकारने घेतला. साधारणपणे संपूर्ण देशांमधून 11 लाख विद्यार्थ्यांनी नेट परीक्षेसाठी अर्ज भरलेला होता. त्यापैकी नऊ लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामध्ये Open प्रवर्गासाठी - 1150 , Obc - 600 , Ews- 600 , SC - 325 , ST - 325 येवढे शुल्क आकारण्यात आले होते. 

सर्व विद्यार्थी वर्षभर या परीक्षेची वाट पाहत असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेस करून तयारी करत असतात,  अभ्यास करत असतात. अशा परिस्थितीमध्ये एनटीए कडून व भारत सरकारकडून अचानकपणे सांगितले जाते की नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. संबंधित परीक्षा रद्द झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान झालेले आहे. 

विद्यार्थी संघटनांची मागण्या  

1. National Testing Agnecy (NTA) बंद करून त्यांच्याकडून सर्व जबाबदाऱ्या काढून घाव्यात. NTA च्या सर्व अधिकाऱ्यांची CBI कडून सखोल चौकशी व्हावी. 

2. सर्व प्रवेश परीक्षा तसेच पात्रता परीक्षांचे शुल्क कमी करण्यात यावे. 

3. UGC-NET परीक्षार्थीना प्रती विद्यार्थी 500 रूपये नुकसानभरपाई देण्यात यावी.

4. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी याची गैरप्रकारांची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा.

5. NEET-UG परीक्षा पुन्हा लवकरात लवकर घेण्यात यावी.

6. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी UGC-NET परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी. 

7. परदेशी शिष्यवृत्ती मधील जाचक अटी रद्द कराव्यात. 

या मागण्यांना घेऊन आज विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. 

आजच्या आंदोलन मध्ये विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती, NSUI, एसएफआय, रिपब्लिकन युवा मोर्चा , वंचित बहुजन आघाडी , रिपब्लिकन विद्यार्थी सेना, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद (A), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोस्ट ग्रॅज्युएट असोसिएशन, न्यू स्टुडंट्स अँड युथ फेडरेशन (NSYF) इ. संघटना सहभागी झाल्या होत्या. 

यावेळी राहुल डंबाळे , सोमनाथ निर्मळ, निहारिका भोसले, बालाजी मिसाळ, सिद्धांत जांभुळकर, रोहित भामरे, हंसराज पुणे, सुजल कांबळे, सतीश गायकवाड, समाधान गायकवाड, मयूर जावळे, अस्मिता थावरे, सृष्टी ठुबरे, रविराज कांबळे, सागर सोनकांबळे, सुरज गायकवाड इ.  विद्यार्थी व संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest