पोलीस, प्रशासन काही करणार नसेल तर भाजपाचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरेल; ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर धीरज घाटे यांची प्रतिक्रिया

भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी फर्ग्युसन रोडवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी घाटे म्हणाले, पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील बारमध्ये ड्रग्ज सापडले. त्या संदर्भामध्ये कालपासून सोशल मीडियावर बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज चालू आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Mon, 24 Jun 2024
  • 05:03 pm

ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर धीरज घाटे यांची प्रतिक्रिया

भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी फर्ग्युसन रोडवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी घाटे म्हणाले, पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील बारमध्ये ड्रग्ज सापडले. त्या संदर्भामध्ये कालपासून सोशल मीडियावर बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज चालू आहे. मागच्या महिन्यात कल्याणीनगर येथे घडलेल्या घटनेमुळे पुण्याची संस्कृती धोक्यात आली आहे. पुण्यामध्ये पब संस्कृती फोफावताना दिसते. भारतीय जनता पार्टी पक्षाकडून आम्ही ही घोषणा करतोय की पुण्यातील पब संस्कृती ही हद्दपार झाली पाहिजे. यासाठी जे-जे करावे लागेल ते भारतीय जनता पार्टी करणार आहे.

घाटे म्हणाले, कालच्या घटनेनंतर आपण बघितले की अनेक राजकीय मंडळींनी या घटनेवर टिप्पणी केली. सरकार म्हणून जे काम करणं आवश्यक आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतीलच. परंतु पोलीस प्रशासन  किंवा महानगरपालिका, या विषयाशी संबंधित जी खाती असतील अशा सर्व खात्यांमधल्या कुचकामी अधिकाऱ्यांनी अशा विषयांमध्ये ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे.  मी या निमित्ताने असा इशारा देतो. जर पोलीस प्रशासन, महानगरपालिका या विषयांमध्ये काही करणार नसेल तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरेल. पुण्यातील पब संस्कृती हद्दपार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हेच पुणेकरांना हवे आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. 

घाटे पुढे म्हणाले, पुण्याच्या संस्कृतीमध्ये आम्ही पब संस्कृती चालू देणार नाही. ही आमची भूमिका असून या विषयावर आम्ही ठाम आहोत. 

तसेच, पुण्यातील शाळांच्या बाहेर असलेल्या पानटपऱ्या काढून टाकण्यासंबंधी एक निवेदन यापूर्वी पोलिसांना दिलं होतं.  पोलीस ते उद्ध्वस्त का करत नाही. अनेक शाळांच्या बाहेर गुटखा आणि धूम्रपान सर्रास चालू असते. पुण्यामध्ये ड्रग्सची विक्री खुलेआमपद्धतीने होताना दिसते, अशी प्रतिक्रिया देवून घाटे पुढे म्हणाले, या विषयांमध्ये काल पोलिसांनी काही कारवाई केली. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं. परंतु माझं यासंबंधी असं म्हणणं आहे की छोटे मासे गळाला लागतात. या विषयांमध्ये संबंधित अधिकारी जो असेल त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे.  अशी मागणी आम्ही राज्य शासनाकडे करणार आहोत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest