Pune Airport : विमानतळाच्या नवीन टर्मिनलला मोदींची प्रतीक्षा

पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले असून येथील प्रवासी सुविधाच्या चाचण्याही झाल्या आहेत. मात्र, उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळत नसल्याने ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. नवीन टर्मीनल सुरू झाल्यावर विमानांच्या संख्येत आणि फेऱ्यांमध्ये वाढ होऊन प्रवाशांच्या संख्येतही वाढ होणार आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन टर्मिनलचे उद्घाटन होणार अशी चर्चा होती.

Pune Airport : विमानतळाच्या नवीन टर्मिनलला मोदींची प्रतीक्षा

विमानतळाच्या नवीन टर्मिनलला मोदींची प्रतीक्षा

काम पूर्ण होऊनही अद्याप कार्यान्वित नाही, प्रवासी संख्या वाढून सुविधा मिळणार, सव्वापाचशे कोटी झाला खर्च

पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले असून येथील प्रवासी सुविधाच्या चाचण्याही झाल्या आहेत. मात्र, उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळत नसल्याने ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. नवीन टर्मीनल सुरू झाल्यावर विमानांच्या संख्येत आणि फेऱ्यांमध्ये वाढ होऊन प्रवाशांच्या संख्येतही वाढ होणार आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन टर्मिनलचे उद्घाटन होणार अशी चर्चा होती. विमानतळ प्राधिकरणाकडून प्रकल्पाच्या उद्घाटनाबाबत कोणतीही स्पष्टता अद्यापपर्यंत दिली गेली नाही.

पुणे विमानतळावरील सध्याच्या इमारतीची जागा कमी असल्याने प्रवासी सेवेच्या विस्ताराला मर्यादा आल्या होत्या. गर्दीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी, त्याचा सुविधेवर पडणारा ताण, सिक्युरिटी चेक इनपासून ते विमानांच्या संख्येवरही याचा परिणाम होत असे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ही अडचण ओळखून पुणे विमानतळाचा विस्तार करण्याचे ठरविले. त्यासाठी नवीन टर्मिनल बांधण्याचे काम हाती घेतले. सुमारे ५२५ कोटीचा खर्च करून ही भव्य इमारत बांधण्यात आली. येथे प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळतील.

नागरी विमान वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वांदेकर म्हणाले की, विमानतळ प्रशासनाने नवीन टर्मिनल कार्यान्वित करण्यासाठी अद्यापपर्यंत तारीख निश्चित केलेली नाही. लवकरात लवकर हे टर्मीनल सुरू करावे, असा आमचा आग्रह आहे. प्रामुख्याने दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी जास्त असल्याने त्याच वेळी हे टर्मिनल कार्यान्वित व्हावे असा आमचा आग्रह होता. मात्र, ते होऊ शकले नाही. 'सीविक मिरर' शी बोलताना विमान प्रवासी अस्मा मोमीन म्हणाल्या की, पुणे विमानतळाला मेकओव्हर आणि नवीन जागेची नितांत गरज आहे. सध्याच्या टर्मिनलवर सुविधा योग्य नाहीत. नवीन टर्मिनल लवकरात लवकर सुरू व्हायला हवे." फरझाना शेख या नियमित प्रवासी म्हणाल्या की, सध्याच्या टर्मिनलवर गर्दीच्या दिवसांमध्ये खूप ताण येतो. त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. नवीन टर्मिनलमध्ये चेक इन काउंटर आणि स्वच्छतागृहांसह इतर सुविधांची काळजी घेतली पाहिजे.

अत्याधुनिक सुविधा

पुणे विमानतळावरील सध्याच्या टर्मिनलला नवीन टर्मिनल जोडलेले आहे. प्रवाशांना एका टर्मिनलमधून दुसऱ्या टर्मिनलमध्ये जाण्यासाठी तीन पुलांचा वापर करता येईल. त्यामुळे गर्दीचे विभाजन होईल. नवीन टर्मिनलमधून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होईल. जुन्या टर्मिनलमध्ये प्रवाशांची गर्दी झाली तर आयत्या वेळेस नवीन टर्मिनलमधून देशांतर्गत विमानांचेदेखील उड्डाण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. सुमारे ६० हजार चौरस मीटर आवारात असलेल्या या नवीन टर्मिनलमध्ये ७२ चेक- इन काउंटर आणि १० एरोब्रिज असतील. सध्याच्या टर्मिनलवरून ९० विमानांना टेक ऑफ आणि लँडिंग करण्यास अनुमती आहे. सध्याची प्रवासी क्षमता २० ते २२ हजार आहे. नवीन टर्मिनलमुळे दररोज १२० विमाने टेक ऑफ आणि लँडिंग करू शकतील. त्यामुळे प्रवासी क्षमता ३२ ते ३३ हजार होणार आहे.

गर्दी नियंत्रणासाठी सेन्सरचा वापर केला जाणार आहे. प्रवाशांच्या बॅगेज चेक करण्याचा वेळ वाचावा म्हणून नव्या इन लाइव्ह बॅगेज प्रणालीचा वापर होणार असल्यामुळे रांग लावावी लागणार नाही.

असे आहे नवे टर्मिनल

क्षेत्रफळ : सुमारे ६० हजार चौरस फूट

प्रवासी क्षमता : वर्षाला एक कोटी २० लाख

| एरोब्रिज : १०

एकूण खर्च : ५२५ कोटी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest