पुणे-सोलापूर महार्गावरील अपघातात वाहने पेटली, चालक भाजला

पुणे सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील सहजपूर फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. केमिकल घेऊन जाणाऱ्या टेम्पोने ट्रेलरला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांनी पेट घेतला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 2 Sep 2023
  • 11:29 am

पुणे-सोलापूर महार्गावरील अपघातात वाहने पेटली, चालक भाजला

पुणे सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील सहजपूर फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. केमिकल घेऊन जाणाऱ्या टेम्पोने ट्रेलरला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांनी पेट घेतला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. यात चालक गंभीज जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, केमिकल घेऊन जाणारा टेम्पो कंटेनरला धडकला. त्यामुळे मोठी आग लागली. टेम्पोमधील पेटते केमिकल महामार्गाच्या बाजूला ढाब्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या टेम्पोवर पडले. त्यामुळे तो टेम्पो देखील आगीच्या भक्षस्थानी पडला. लागलेल्या आगीत तीन ट्रक अक्षरशः जळून खाक झाले.

या अपघातात एका वाहनाचा चालक आगीत भाजला असून त्याला उपचारासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, अपघात जीवितहानी झाली का ? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest