वळसे पाटील यांचा अपघात; घरातच पाय घसरून पडल्याने हाताला फ्रॅक्चर

मंत्री दिलीप वळसे पाटील हे घरात पाय घसरून पडल्याची माहिती समोर आली आहे. वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागला असून त्यांचा हातही फ्रॅक्चर झाला आहे.

संग्रहित छायाचित्र

मंत्री दिलीप वळसे पाटील हे घरात पाय घसरून पडल्याची माहिती समोर आली आहे. वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागला असून त्यांचा हातही फ्रॅक्चर झाला आहे. आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात वळसे पाटील यांना दाखल केले आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वळसे पाटील यांचा अपघात झाल्याने ते दुखापतग्रस्त झाले आहे. काल रात्री अंधारात लाइट सुरू करण्यासाठी जात असताना वळसे पाटील पाय घसरून पडले. त्यांच्या हात, पाय आणि पाठीला दुखापत झाली. औंध येथील खासगी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. वळसे पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. परंतु पुढील १२ ते १५ दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू राहतील असा अंदाज आहे. 

या अपघातासंदर्भात वळसे पाटील यांनी एक्स अकाऊंट वर माहिती दिली,  'काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल', असे ते म्हणाले. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest