मेट्रोच्या कामासाठी पुणे विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामधील मेट्रोच्या गर्डर कास्टींगचे काम केले जाणार आहे. तसेच, स्टील गर्डरच्या कामासाठी औंध-बाणेर-पाषाण रस्त्यावरील वाहतुकीत प्रायोगिक तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आले आहेत.

संग्रहित छायाचित्र

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामधील मेट्रोच्या गर्डर कास्टींगचे काम केले जाणार आहे. तसेच, स्टील गर्डरच्या कामासाठी औंध-बाणेर-पाषाण रस्त्यावरील वाहतुकीत प्रायोगिक तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. हे काम सोमवार आणि मंगळवारी होणार आहे. त्याकरिता वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.  (Pune University Chowk Traffic)

पाषाण रोड - पुणे विद्यापीठ चौक ते अभिमान श्री चौक दरम्यान रस्त्यावरुन सध्या असलेली एकेरी वाहतूक दुहेरी करण्यात आली आहे. यासोबतच,  बाणेर रोडवरुन पुणे विद्यापीठ चौकामध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याकरिता बाणेर रोडवरुन पुणे विद्यापीठ चौकमध्ये येणाऱ्या वाहन चालकांनी अभिमान श्री चौक बाणेर रोड येथून उजवीकडे वळण घेऊन अभिमान श्री चौक पाषाण रोडने विद्यापीठ चौकामध्ये यावे व इच्छित स्थळी जावे. तसेच, पुणे विद्यापीठ चौकामधून औंध रोडने जाणाऱ्या वाहन चालकांनी पुणे विद्यापीठ चौकामधून औंध रोडने जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest