उपायुक्त संभाजी कदम, विजय चौधरी, निरीक्षक संतोष सुबाळकर यांना पोलीस महासंचालक पदक

पुणे : राज्यातील विविध पोलीस घटकांमधील तसेच आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले. यामध्ये पुण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय चौधरी, पोलीस निरीक्षक संतोष सुबाळकर

कोथरूडमधून दहशतवादी पकडून देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान

पुणे : राज्यातील विविध पोलीस घटकांमधील तसेच आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले. यामध्ये पुण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ट्रिपल महाराष्ट्र केसरी) विजय चौधरी आणि दहशतवाद विरोधी पथकाचे (पुणे) पोलीस निरीक्षक संतोष सुबाळकर यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. यासोबतच कोथरूडमध्ये रात्र गस्तीवर असताना ‘इसिस’शी संबंधित ‘अह ऊल सुफा’ या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी पकडून दिलेल्या पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन यांना देखील महासंचालक पदक जाहीर झाले आहे. 

उपायुक्त कदम यांनी यापूर्वी बीड येथे तीन वर्ष सेवा दिली असून पुणे ग्रामीण पोलीस दलात देखील त्यांनी सेवा बजावली. ते बारामती उपविभागीय अधिकारी म्हणून लोकप्रिय झाले होते. यासोबतच जालना येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर येथे गुन्हे शाखेचे उपायुक्त, पुणे शहर पोलीस दलात यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागात पुणे विभागाचे अधीक्षक म्हणून देखील त्यांनी उत्तम सेवा बजावली आहे. त्यांनी आजवर बजावलेल्या उत्कृष्ट सेवा आणि कर्तव्यासाठी त्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे. 

तर, एसीबीचे अतिरिक्त अधीक्षक विजय चौधरी यांनी २०१४, २०१५ आणि २०१६ अशी सलग तीन वर्ष ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती जिंकली होती. त्यांची ओळख ‘ट्रिपल महाराष्ट्र केसरी’ अशी बनली आहे. ते मूळचे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील सायगयाव बगळी या गावातील आहेत. त्यांनी नुकतेच ‘जागतिक पोलीस अँड फायर गेम्स’ स्पर्धेत नुकतेच १२५ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले आहे. सध्या ते हिंद केसरी पै रोहित पटेल यांच्याकडून कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. 

‘एटीएस’मध्ये पोलीस निरीक्षक पदावर नेमाणुकीस असलेले संतोष सुबाळकर हे उत्कृष्ट कवी देखील आहेत. मागील 19 वर्षांपासून ते पोलीस दलात सेवा बजावत आहेत. मुंबईवरील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्या च्या (२६/११) तपासात सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले आहे. दहशतवादी अजमल कसाब, अबू जुंदाल विरुद्धच्या खटल्यात त्यांनी महत्त्वपूर्ण साक्ष दिली होती. गडचिरोलीतील नक्षलप्रवण क्षेत्रामधील अनेक नक्षल कॅंप नष्ट करण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. गेल्या सात वर्षांपासून ते दहशतवाद विरोधी पथकात नेमणुकीस आहेत. कारकिर्दीत त्यांनी खालीस्तानी चळवळ, एलईटी, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आदी संघटनांतील देशविघातक प्रवृत्तींना अटक करण्यात मोलाची भूमिका बजावली. 

यासोबतच पुणे शहर पोलीस दलामधील मोटार परिवहन विभागातील सहायक फौजदार अंकुश गोळे, गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार सुनील पगारे, फरासखाना पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार वैशाली गोडगे, मोटार परिवहन विभागातील हवालदार प्रवीण जाधव, शिवाजीनगरचे हवालदार रुपेश वाघमारे, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे हवालदार आनंद कुलकर्णी, गुन्हे शाखेचे हवालदार संजय जाधव, अहमद देवर्षी, पर्वतीच्या हवालदार राणी शिंदे, वाहतूक शाखेचे हवालदार सत्यवान साबळे, कोथरूड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest