Pune: पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त वाहतुकीत बदल; पुणे-सोलापूर रस्त्यावरील जड वाहतूक वळवली

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या रेसकोर्स येथे सभा पार पडणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, आमदार व माजी खासदार उपस्थित राहणार आहेत.

संग्रहित छायाचित्र

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या रेसकोर्स येथे सभा पार पडणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, आमदार व माजी खासदार उपस्थित राहणार आहेत. तसेच, बारामती, पुणे, शिरूर, मावळ लोकसभा मतदार संघामधून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते येणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी काढले आहेत. (Pune Traffic News)

रेसकोर्स परिसरामधील पाणी टाकी ते टर्फ क्लब चौक रस्त्यावर दुहेरी वाहतुक करण्यात आली आहे. टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौकादरम्यानचा रस्ता बंद करण्यात आला आहे. सोलापुर रस्त्यावरील अर्जुन रोड जंक्शन ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार हा रस्ता देखील बंद करण्यात येणार आहे. यासोबतच बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद राहणार आहे. त्याकरिता मम्मादेवी जंक्शन येथुन व बेऊर रोड जंक्शन येथुन इच्छित स्थळी जाण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच, गोळीबार मैदान ते भैरोबानाला (सोलापुर रोड) हा रस्ता आवश्यकतेप्रमाणे बंद केला जाणार आहे. त्यासाठी  गोळीबार मैदान चौक - लुल्लानगर ते इच्छित स्थळी जाण्याचा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. भैरोबानाला ते गोळीबार मैदान चौक (सोलापुर रोड) हा रस्ता बंद राहणार असून भैरोबानाला ते लुल्लानगर ते इच्छित स्थळी जाण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. 

यासोबतच मोरओढा ते भैरोबानाला (एम्रेसगार्डन रोड) या रस्त्याऐवजी मोरओढा - घोरपडी रेल्वेगेट - बी. टी. कवडे रस्त्याने जावे. वॉर मेमोरीयल ते घोरपडी ते डोबारवाडी मार्गे बी. टी. कवडे रोडने इच्छित स्थळी जावे. तसेच, भैरोबानाला ते मोरओढ़ा याकरिता बी. टी. कवडे जंक्शन ते बी.टी. कवडे रोडने उड्डाणपुलावरुन जावे. मोरओढा ते मम्मादेवी (काहुन रोड जंक्शन बेऊर रोड मार्गें) जाण्याऐवजी मोरओढा - सदर्न कमांड - कॉन्सिल हॉल - ब्लु नाईल हॉटेल मार्गे जावे. तसेच, गोळीबार मैदान, मम्मादेवी चौक, भैरोबानाला चौक, आंबेडकर पुतळा चौक कॅम्प, कोरेगाव पार्क जंक्शन, ताडीगुत्ता चौक, नोबल हॉस्पीटल या दरम्यानचा वाहतुकीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातून जाण्याऐवजी नगररोडने जाण्यासाठी पोल्ट्रीफार्म चौक ते संगमवाडी मार्गे तसेच सोलापुर रोड ते जेधेचौक जाण्यासाठी लुल्लानगर, गंगाधाम चौक, सातारा रोड याचा वापर करावा. त्याचप्रमाणे मंतरवाडी, खडीमशिन चौक, कात्रज रोड या बाह्य वळण रस्त्याचा तसेच खराडी बायपास, मुंढवा, नोबल हॉस्पीटल रोडचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सभेला येणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा

भैरोबानाला ते वानवडी बाजार पोलीस चौकी चौक दरम्यान, वानवडी बाजार ते मम्मादेवी जंक्शन येथे वाहने लावावीत. तसेच,  पुणे-अहमदनगर, पिंपरी चिंचवड़ येथून येणाऱ्या वाहनांसाठी सर्किट हाऊस ते मोरओढ़ा, वॉर मेमोरीयल ते घोरपडी गेट, आर्मी पब्लीक स्कुल घोरपडी गाव येथे व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे-सातारा, सिंहगड व स्वारगेट परिसरामधून येणाऱ्या वाहनांकरीता बेऊर रोड जंक्शन, कोयाजी रोड अंतर्गत रस्ते, तिनतोफा चौक, बीशप स्कुल परिसर याठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या बसची व्यवस्था रामटेकड़ी उड्डाणपुलावरुन गेल्यानंतर हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये करण्यात आली आहे.  सर्व व्हीव्हीआयपी यांना भैरोबानाला चौक ते आर्मी पब्लीक स्कुल दरम्यान एंम्प्रेस गार्डन येथे पार्किंग सुविधा देण्यात आली आहे.

सर्व प्रकारची जड वाहने, ट्रेलर्स, कंटेनर्स, ट्रक्स, मिक्सर, डंपर, बल्कर व अन्य माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. सोलापूर रस्त्यावरील थेऊर फाटा, मंतरवाडी फाटा, खडी मशीन चौक, कात्रज चौक, वडगाव पूल, चांदणी चौक, हॉटेल राधा चौक, रंजीव गांधी पूल, हॅरीस पूल, बोपखेल फाटा, लोहगाव येथील गाव चौक, नगर रस्त्यावरील थेऊर फाटा चौक  येथूनच जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest